Pune : पुण्यातून (Pune) राजकीय क्षेत्रातील एक महत्वाची बातमी समोर येत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत बाबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत उद्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात त्यांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. बाबर यांच्या पक्ष प्रवेशानं पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. 

Continues below advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर हे नाराज होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर महादेव बाबर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. पण अखेर महादवे बाबर यांचा राजकीय पक्ष ठरला आहे. ते उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. 

हडपसर मतदारसंघाचा इतिहास

हडपसर विधानसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून येथे तीन निवडणुका झाल्या आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी येथून प्रत्येकी एकदा विजय मिळवला. 2009 मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये भाजपने हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना उमेदवार म्हणून उभे केले. टिळेकर यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. त्यानंतर 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन विट्ठल तुपे यांना विजय मिळवला होता. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघात हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते. शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि अजित पवार गटाचे चेतन तुपे यांच्यातील थेट लढतीने या मतदारसंघाकडे राज्यभराचे लक्ष वेधले होते.  तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर यांनीदेखील निवडणूक लढवली होती. मात्र या मतदारसंघात इतिहास रचत सलग दुसऱ्यांदा चेतन तुपे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर यांना पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तुपे यांनी 7122 मतांनी विजयी आघाडी घेत मतदारसंघात पुन्हा विजय मिळवला आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Mahadev Babar: 'आम्ही सहा तास थांबून होतो, पण उद्धव ठाकरे फक्त 40 सेकंद भेटले'; प्रशांत जगतापांना उमेदवारी मिळताच महादेव बाबरांनी तोफ डागली