पुणे : पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस (Mhada Pune) वाढत आहे. त्यामुळे पुण्यात घरांचीदेखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील अनेक शहरांमधील नागरिक कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाल्यानं घरांची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. याच नागरिकांसाठी आता सुवर्णसंधी आहे. या सगळ्यांचं  पुणे शहरात घर कमी किमतीत घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून पाच हजार घराची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्रक्रिया कधीपासून सुरु होणार आहे, यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. 


मुंबईनंतर आता पुण्यात पाच हजार घरांची सोडत निघणार आहे. यासाठी 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरु होईल. पुणे म्हाडासाठी विविध गट असणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च असे गट असतील. पुणे शहरासह सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसाठी सोडत निघणार आहे, अशी माहिती पुणे म्हाडा मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.


पुणे, कोकण, औरंगाबादमध्येही सोडत


म्हाडाच्या सुमारे 10 हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. यात पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या 600  घरांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळांतील घरांच्या सोडतीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच 25ऑगस्टपासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे.  


मागील सोडतीत  5211 अर्जदार ठरले होते विजेते...


यापुर्वी 18 ऑगस्ट 2022 ला पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर (Pune Solapur Kolhapur MHADA Lottery) जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार घरांची सोडत पार पडली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली होती. एकूण 5211 घरांसाठी सुमारे 71 हजार 742 अर्ज सादर झाले होते. या सोडतीद्वारे 5211 अर्जदार विजेते ठरले होते. सागर खैरनार हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते ठरले होते.  या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5211 घरांचा समावेश होता. यात 20 टक्के योजनेतील 2088, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील 170, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य गटातील 2675 आणि म्हाडाच्या विविध योजनेतील 279 घरांचा समावेश  होता.


संबंधित बातमी-                                   


Mhada Lottery 2023 :म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत वेटिंगवर तर जालन्यातील आमदार कुचे ठरले यशस्वी विजेते