Pune Lonavala News : लोणावळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने लोणावळ्यात आत्महत्याकेल्याची घटना घडली आहे. मित्राला आणि पत्नीला मेल, मेसेज करुन लायन्स पॉईंटच्या दरीत त्याने उडी मारली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. नेमकी या तरुणाने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. 

250 फूट खोल दरीतून मृतदेह शोधून वर काढला

दरम्यान, शिवदुर्गने 250 फूट खोल दरीतून मृतदेह शोधून वर काढला आहे. गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेच्या दरम्याने विरेंद्र सिन्हा वय 32 राहणार पुणे जो बाणेर येथील एका आय टी कंपनीत कामाला होता, त्याने आत्महत्या केल्याचा संशय होता.  कारण आज सकाळी त्याची चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे पार्क केलेली आढळली होती. त्याने येथूनच त्याच्या मित्रांना व पत्नीला मेसेज व मेल द्वारे याबाबत पहाटेच कळवले असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील दरीत शोध सुरु केला असता ज्या ठिकाणी त्याने गाडी पार्क केली होती तेथील समोरील दरीत साधारण 250 फूटांवर विरेंद्र सिन्हा याचा मृतदेह आढळला. साधारण संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मृतदेह वर काढून पोलीसांच्या स्वाधिन केला आहे.

बीड जिल्ह्यात भीषण अपघात, शेतमजुराचा जागीच मृत्यू

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. माजलगाव येथील हिवरा बुद्रुक गावात शेतीच्या वळण रस्त्यावर वळवताना चालक असणाऱ्या शेतमजुराच्या अंगावर ट्रॅक्टर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही  घटना घडली आहे. मृ तरुण हा हिवरा बुद्रुक येथील शेतमजूर असून,  गणेश भारत गाडे वय 28 असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गुरवारी पहाटे 2 वाजता शेतातील कामासाठी ट्रॅक्टर चालवत जात होता. यावेळी शेत वळण रस्त्यावर ट्रॅक्टरला टर्न मारत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टर अंगावर पडल्याने गणेश गाडे यात गंभीर जखमी झाला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे तरुणाच्या गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी संपवल जीवन, धक्कादायक वास्त समोर