Pune : लोणावळ्यात एक धक्कादाययक घटना घडली आहे. टायगर पॉईंटच्या खोल दरीत फडी घेत एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मुंबईहून ट्रेकसाठी आलेली श्रेया पती या तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू झाला नसून ती आत्महत्या असल्याचं लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर 390 फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. तर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी पंचनामा करताना या ठिकाणी तपासणी केली असता, पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
परिवारातील अंतर्गत कलहामुळं श्रेया पती नेहमी तणावात होती
परिवारातील अंतर्गत कलहामुळं नेहमी तणावात राहणारी श्रेया पती या तरुणीने मुंबईवरून थेट लोणावळा गाठत आपली जीवन यात्रा संपवली. परंतु तिचा मोबाईल आणि लॅपटॉप अजूनही लॉक असल्याने महत्वाचे पुरावे गोळा करण्यास अडचण येत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी माहिती दिली आहे. लोणावळ्याच्या टायगर पॉईंट दरीत घडलेली ही घटना प्रत्येकाला सुन्न करणारी ठरली आहे.
अथक प्रयत्नांनंतर 390 फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला
मुंबईहून ट्रेकसाठी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर 390 फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. धोकादायक दरी, अंधार आणि वेळेशी झुंज देत हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आले होते. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी पंचनामा करताना या ठिकाणी तपासणी केली असता, पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
1 फेब्रुवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती
दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील श्रेया पती (वय 19 ) ही तरुणी लोणावळ्याला ट्रेकसाठी आली होती. ड्युक्स नोज परिसरात ट्रेक करण्यासाठी ती गेली; मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. रात्री नातेवाईकांनी शोध घेत लोणावळ्यात चौकशी केली. त्यावेळी ती परिसरात आलेली होती व परत गेल्याची माहिती मिळाली. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली. त्याचवेळी टायगर पॉईंट परिसरात सापडलेली बॅग ही श्रेयाचीच असल्याचे स्पष्ट झाले. सकाळी 11.30 वाजता रेस्क्यू टीमला शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आले. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून दुपारी 2.30 वाजता शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड, पोलीस ड्रोन आणि नंतर लाइटनिंग ड्रोनच्या सहाय्याने शोध सुरू असतानाच दुपारी 4.45 वाजता सुमारे 390 फूट खोल दरीत मुलीचा मृतदेह आढळून आला.
अंधार असतानाही अत्यंत कठीण परिस्थितीत दोरी, स्ट्रेचर आणि वॉकी-टॉकीच्या सहाय्याने मृतदेह सुरक्षितपणे वर काढण्यात आला. रात्री 9.30 वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही संपूर्ण शोध मोहीम पोलीस प्रशासनाच्या आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसाने यशस्वी झाली. पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.