Pune Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांसाठीएकअतिशयमहत्वाचीबातमीसमोरआलीआहे. पुण्यातील (Pune Rain Aleart) मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा (Pune Rain News) विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन 45,000 क्युसेक्स करण्यात येणार आहे. परिणामी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनाखबदारीघेण्याचंआवाहनप्रशासनानेकेलंआहे. त्याचबरोबर नदी पात्रातील रस्ते आणि बांधकामे देखील पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातयोग्यती खबरदारी घेण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. (Pune Rain Aleart)

Continues below advertisement

Pune Rain: सावधान! मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन 45,000 क्युसेक्स करण्यात येणार

हवामानविभागानेदिलेल्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्यासाठी आज 'रेड अलर्ट' (Pune Rain Aleart) जारी केला आहे. पुढील दोन ते चार दिवस पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून, प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून पुण्याजवळील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असल्यानेपाणलोटआणिधारणक्षेत्रातमोठ्याप्रमाणातपाण्याचीआवकवाढलीआहे. परिणामीआता पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन 45,000 क्युसेक्स करण्यात येणार असल्याचीमाहितीआहे.

Continues below advertisement

Khadakwasla Dam Water Discharge : खडकवासला धरणातून आज दुपारी 3 वाज 43,571 क्युसेक्सने विसर्ग

दरम्यान, धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यामुळे मुळे आज दुपारी 3 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 35,574 क्युसेक विसर्ग वाढवून 43,571 क्युसेक्स इतका करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिस्थितीचा आढावा घेता खडकवासला धरणातून विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून सुमारे ४५,००० क्युसेक्सपर्यंत करण्यात येण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी तात्काळ पुढील खबरदारी घ्यावी, असेआवाहनकरत मुठा नदीकाठावरील सर्व नागरिकांना सतर्ककरण्यातआलेआहे.

- मुठा नदीपात्रात अथवा नदीकाठी जाऊ नये.

- नदीपात्रातील पाण्याचे पंप, शेतीची अवजारे, वाहने, जनावरे व इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे.

- नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

- कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच अवलंबून राहावे.

-संबंधित सर्व विभागप्रमुख महानगरपालिका, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासन यांनी आपल्या स्तरावर नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांना तात्काळ सतर्कतेचा इशारा देऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. असेप्रशासनाकडूनसांगण्यातआलेआहे.