एक्स्प्लोर

धक्कादायक! पूल कोसळल्यानं इंद्रायणी नदीत 25 ते 30 पर्यटक बुडाले, बचावकार्य सुरु, नेमकी कशी घडली घटना?

पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर ( Indrayani river)  असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे.

Pune Indrayani River Bridge Collapses :  पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर ( Indrayani river)  असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यामुळं पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे. यामुळं अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये काही लहान मुळे देखील असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या ठिकाणी बचावकार्य सुरु झाले आहे. 

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. याठिकाणी असणारा पूल जूना आहे. त्यामुळं पुलाची क्षमता ही कमकुवत झाली होती असे दिसत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक पर्यटक या भागात फोटो घेत होतो. एकाच वेळी अनेक पर्यटक पुलावर आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 20 ते 25 पर्यटक नदीत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. नागरिकांनी या परिसरात गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ घटनास्थळी दाखल

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरु आहे.

पूल जर धोकादायक असेल तर तो बंद करणं गरजेचं होतं : सुप्रिया सुळे

आता सरकारने तातडीने मदत करणे गरजेचं आहे. प्रशासनाने घटनास्थळी तातडीने जाऊन मदत करावी असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. याबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा केल्याची माहिती सुळे यांनी दिली आहे. प्रशासन पूर्ण सक्रिय झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पूल जर धोकादायक असेल तर तो बंद करणं गरजेचं होतं असेही सुळे म्हणाल्या. पण आत्ता तातडीने पूर्ण ताकतीने मदत करणे आवश्यक असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. 

महत्वाच्या बातम्या:

Pune News : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Gold Silver Rate : चांदीनं सव्वा दोन लाखांचा टप्पा गाठला, सोने दराचा नवा उच्चांक, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर
सोने चांदीची दरवाढीची एक्सप्रेस सुस्साट, चांदीकडून सव्वा दोन लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या नवे दर
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं

व्हिडीओ

Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Gold Silver Rate : चांदीनं सव्वा दोन लाखांचा टप्पा गाठला, सोने दराचा नवा उच्चांक, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर
सोने चांदीची दरवाढीची एक्सप्रेस सुस्साट, चांदीकडून सव्वा दोन लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या नवे दर
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
NCP Sharad Pawar: BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC Election 2026: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Embed widget