Pune : एकेकाळचे शेतकरी चळवळीतले सख्खे मित्र पण सध्या राजकारणामुळं दूर गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी ( Raju Shetti) आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे आज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. हे दोन्ही नेते शेतकरी आंदोलनाच्या न्यायालयीन संदर्भातील प्रकरणासाठी इंदापूर न्यायालयात उपस्थित होते. वकिलांच्या बार रुममध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर एकत्र बसल्याचे पाहायला मिळाले, मात्र दोघांनीही एकमेकांकडे नजरही टाकली नाही.
शेतकरी आंदोलनाच्या न्यायालयीन संदर्भातील प्रकरणासाठी आज इंदापूर न्यायालयात माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. वकिलांच्या बार रूममध्ये दोघे एका सोफ्यावर एकत्र बसले असले तरी त्यांनी एकमेकांकडे नजरही टाकली नाही. यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी थेट सदाभाऊ खोतांवर निशाणा साधला. तुम्ही दोघे एका केस संदर्भात कोर्टात एकत्र आला आहात, भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्र दिसणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांशी राजू शेट्टी यांना विचारला होता. यावेळी शेट्टी म्हणाले की, सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात असेल असे मला वाटत नाही, असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला.
2017 साली सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी
2017 साली सदाभाऊ खोत हे राज्याचे कृषी राज्यमंत्री होते, त्यावेळी त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संघटनेचे माजी अध्यक्ष दशरथ सावंत यांच्या नेतृत्तवाखालील समितीने त्याची घोषणा केली होती. सदाभाऊ यांची संघटनेप्रति निष्ठा राहिली नाही, अशी शब्दांत समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला होता. राजू शेट्टी यांनी तत्काळीन सरकारची साथ सोडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेतील लोकांनी केली होती. मात्र, खोतांनी राजीनामा न दिल्यामुळं त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर सदाभाऊ खोतांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली होती.
शेतकरी संघटनेतील मतभेदांमुळं सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींपासून फारकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी स्वत: ची रयत क्रांती नावाची संघटना स्थापन केली होती. गेल्या काहीवर्षात काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेत्यांनी राजू शेट्टींची साथ सोडली आहे. यामध्ये आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार देवेंद्र भुयार, रविकांत तुपकर यांनी देखील शेट्टी यांची साथ सोडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Raju Shetti : ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, ते ही अतिरेकीच; पहलगामनंतर राजू शेट्टींच्या निशाण्यावर सरकार