Pune: भारतात पर्यटनासाठी अनेक परदेशी पाहुणे येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे भुरळ त्यांनाही पडल्याशिवाय राहत नाही. महाराजांच्या गड किल्ल्याचे पराक्रमाचे कौशल्य पाहण्यासाठी सिंहगडावर आलेल्या अशाच एका परदेशी तरुणाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या टोळक्याने शिवीगाळ करायला लावत मराठी अस्मितेला कलंक लावण्याचा काम केल्याचा समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. आपल्या देशाचा सौंदर्य किंबहुना महाराष्ट्राच्या शौर्याचा ठेवा अभिमानानं सांगायचा की पर्यटकाला शिव्या शिकवायच्या? असा संताप या व्हिडिओवर व्यक्त केला जातोय. (Sinhgad Tourist Video Viral)
नक्की घडलं काय?
न्यूझीलंड देशातून पुण्यातील सिंहगड किल्ला सर करण्यासाठी आलेल्या पर्यटकाला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले. अर्थात परदेशी तरुणाला मराठी किंवा भारतीय भाषा येत नसल्यामुळे त्याची गंमत करण्याच्या हेतूने तरुणांनी त्याला अश्लील शिव्या शिकवल्या. समोर जो कोणी दिसेल त्याला हे जाऊन म्हणा असे सांगितले. तरुणांनी सांगितल्याप्रमाणे तोही समोर दिसलेल्या तरुणाला शिकवलेल्या शिव्या म्हणाला. त्यावर समोरच्या तरुणांनी आणखी शिव्या शिकवत मागील टोळक्याला द्यायला सांगितल्या. हे तरुण काहीतरी चुकीचं म्हणायला सांगत असल्याचं लक्षात आल्यावर पर्यटक तरुण पुढे निघून गेला. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठी चर्चा आहे. पर्यटक तरुणाला अश्लील मराठी शिव्या शिकवल्या. पर्यटकांनीही नकळत शिवीगाळ केली. त्याने नकळत दिलेल्या शिवीगडावर तरुण खिदळत असल्याचं लक्षात आल्यानंतर हे चुकीचं शिकवता येत असं पर्यटकांच्या लक्षात आलं. या व्हिडिओवर सध्या मोठा संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाला शिव्या शिकवल्याने आपल्या संस्कृतीला डाग लागल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.हे तरुण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. आपल्या देशात, महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकाला शिवीगाळ शिकवणाऱ्या टोळक्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही होत आहे. अनेकदा परदेशी पर्यटकांशी होणारा स्थानिकांचा व्यवहार फारसा बरा नसल्याचा अनुभव अनेक पर्यटकही कायम व्यक्त करतात. सिंहगडावरील या घटनेने हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे.
हेही वाचा: