Pune Daund Crime News :पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात धक्कादायक घटनाघडली आहे. दौंड पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवाराला कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण गटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. आफताब सय्यद असं मारहाण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आफताब सय्यद यांना वैयक्तिक कारणावरुन मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे.

Continues below advertisement

वैयक्तिक कारणावरुन जमावाकडून आफताब सय्यद यांना मारहाण केली

दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारावर भर चौकात कोयता उगारून बेदम मारहाण करण्यात आली आहे. वैयक्तिक कारणावरुन जमावाकडून दौंड नगरपरिषद निवडणूक लढवणाऱ्या आफताब सय्यद या उमेदवाराला दौंड पोलीस ठाण्यासमोरच बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. भर चौकात मारहाण आणि धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यावर पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं दौंड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. 

नायलॉन मांजामुळं दुचाकीस्वार युवकाचा गळा चिरला, खामगाव येथील जलंब मार्गावरील घटना

खामगाव येथील जलंब मार्गावर दुचाकी वर जाणाऱ्या एका युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा कापल्या गेल्याची घटना आज दुपारी एकच्या दरम्यान घडली. या युवकावर स्थानिक एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून युवकाची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने युवकाचे प्राण वाचले असले तरी युवकाच्या गळ्याला गंभीर जखम झालेली आहे.

Continues below advertisement

भंडाऱ्याच्या वैनगंगेत बुडून 16 वर्षीय बालकाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात नागरिकांना यश

मकर संक्रांतीच्या पवित्र स्नानासाठी वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पात्रात उतरलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तर, दोघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील वैनगंगा नदीच्या तीरावर घडली. क्षितिज लांजेवार (16) असं वैनगंगे बुडालेल्या बालकाचं नाव आहे. तर, आर्यन ठाकरे आणि रुद्र अमृते या दोघांना वाचविण्यात नागरिकांना यश आलं आहे. हे तिघेही इयत्ता दहावीत शिकणारे विद्यार्थी असून वर्गमित्र असल्यानं आज वैनगंगेत पवित्र स्नानासाठी गेले असताना ही घटना घडली.

महत्वाच्या बातम्या:

Nandurbar Crime News : वडील आईला करायचे मारहाण, मुलाने रागाच्या भरात थेट बापाचा जीव घेतला अन् नंतर...; नंदुरबारमध्ये खळबळ