Pune Crime News : पुण्यामध्ये (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सनशाईन स्पा (Sunshine Spa) वर पोलिसांनी (Police) छापा टाकून वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे. यामध्ये पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत होते. चंदननगर पोलिस स्टेशनच्या पथकाने कारवाई करत "SUN SHINE SPA" या स्पावर छापा टाकून तिथे सुरु असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे. 

Continues below advertisement


पाच पीडित महिलांची सुटका, मुख्य आरोपीसह अन्य तीन जणांना अटक 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपीसह अन्य तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 'मसाज पार्लर’च्या नावाखाली अनैतिक धंदा चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे. संदीप चव्हाण (मुख्य आरोपी), रोहित शिंदे, मॅनेजर गोपाळर श्वेता उर्फ स्वाती सूर्यवंशी (स्पा व्यवस्थापक) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींवर PITA कायद्यानुसार (कलम 3, 4, 5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या:


Dhule Crime : बारावीचा फॉर्म भरण्यावरून मोठा वाद, पालकांकडून शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; धुळ्यातील धक्कादायक घटना