Pune Crime : पोलीस अधिकाऱ्याने मागितली 35 हजारांची लाच, ACB ने रचला सापळा, पुण्यातील पौडमध्ये रंगेहात पकडलं
पुण्यातील पौड पोलीस स्टेशनच्या एएसआयला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सचिन शिंदे असं या लाचखोर एएसआयचं नाव आहे.
Pune Crime News : पुण्यातील पौड पोलीस स्टेशनच्या एएसआयला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सचिन शिंदे असं या लाचखोर एएसआयचं नाव आहे. 35 हजारांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून सचिन शिंदेला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळं पौड परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारीच लाच घेत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे असा सवाल नागरिक करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पौड मध्ये एका अपघातानंतर दोन वाहनांतील व्यक्तींमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणात गाडी जमा करुन न घेणे, अटक करुन न घेणे आणि इतर कायदेशीर कारवाईत मदत करणे यासाठी पोलीस अधिकाऱ्याने ही लाच मागितली होती. तक्रारदाराने यासंबंधी एसीबीकडे (ACB) कडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करुन एसीबीने आज सापळा रचला, ज्यात सचिन शिंदे अडकला. 35 हजारांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून सचिन शिंदेला बेड्या ठोकल्या आहेत.
दोन दिवसापूर्वीच मुंबईच्या एसीबीनं पोलीस निरीक्षकाला लाच घेतना केली होती अटक
मुंबईच्या मालाड परिसरात कुरार पोलीस स्टेशनमध्ये एसीबीनं (ACB) मोठी कारवाई केली आहे. कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेसह एका पीएसआयला (PSI) लाच घेताना अँटी करप्शनच्या रंगेहात अटक केली आहे. फिर्यादी वकील यांचा गुन्हा नोंद करण्यासाठी पीएसआय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये गुन्हा दाखल करताना पोलीस अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच घेतली होती. मात्र, उर्वरित एक लाखाची रक्कम आज घेताना एसीबीच्या टीमने रंगेहात अटक केली आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती
मुंबईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. मलाडमध्ये कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेसह एका पीएसआयला अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. फिर्यादीकडून यापूर्वी दोन लाख रुपये घेतले होते. उर्वरित 1 लाख रुपयांची लाच घेताना आज एसीबीने दोघांना रंगेहात पकडले आहे. दरम्यान, दिवसेंदिवस लाच घेण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:

























