Pune Crime News : पुणे (Pune) जिल्ह्यातून सातत्यानं गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहेत. पुण्यात तीन तरुणांच्या टोळक्याकडून रस्त्यावरुन जात असलेल्या एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, ही घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून 2 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नरेश रामचंद्र तिडंगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Continues below advertisement


आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेताच हल्लेखोर पसार 


मिळालेल्या माहितीनुसार, नरेश रामचंद्र तिडंगे (वय 40) हे धानोरी रोड विश्रांतवाडी परिसरात काम करतात. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 3 तरुणांनी कोयत्याने त्यांना अडवून त्यांच्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात नरेश जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. हे दोघेही जणं विश्रांतवाडी परिसरातील असून त्यांचा साथीदार फरार आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. 


पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ


एकूण परिस्थिती पाहता, सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यावर आता गुन्हेगारीचे सावट गडद होत चालले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र पाहया मिळत आहे. खून, मारामाऱ्या, चोरी अशी घटना पुण्यात सतत घडत असल्याचे समोर येत आहे. पुणे शहरात पोलिसांच्या नोंदीनुसार 38 हजार गुन्हेगार वास्तव्यास अससल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.  त्यात सराईत गुन्हेगारांचे प्रमाण आठ ते दहा हजारांपर्यंत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यात गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या गुन्हेगारांना, गुंडांना लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासन देखील सतर्क आहे. शहरात असा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना घडू नये म्हणून पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिसांसमोर या गुन्हेगारीला लगाम घालण्याचे मोठे आव्हान आहे. पुणे शहरात दरवर्षी सरासरी सात ते आठ हजार गुन्हे नोंदवले जात होते. मात्र, २०२१ नंतर त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ही आकडेवारी केवळ वाढती गुन्हेगारी दर्शवत नाही, तर समाजातील अस्थैर्य अधोरेखित करीत आहे. गुन्ह्यांच्या स्वरूपातही गेल्या काही वर्षांत बदल झाला आहे. पारंपरिक स्वरूपाच्या चोरी, दरोडा, खुनाच्या घटनांबरोबरच आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हेगारी, महिलांवर बलात्कार, विनयभंग, हुंडाबळीच्या घटना वाढल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Mumbai news: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! 'डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो, 2 हजार द्या' नवी मुंबईतला संतापजनक VIDEO आला समोर