Pune Crime News : पुण्यात (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कुठे गोळीबार तर हाणामारी अशा घटना घडत आहेत. आज देखील पुण्यात हाणामारीची घटना घडली आहे. पुण्यातील तुळशीबागेत दुकान लावण्यावरुन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. 10 ते 12 जणांकडून एका दाम्पत्याला मारहाण करण्यात आली आहे.
तुम्ही बाहेरुन आला आहात तिथे दुकानात लावू नका असे म्हणत केली मारहाण
दहा वर्षांपासून दुकान लावणाऱ्यांना इथे दुकान लावू नका असे म्हणत 10 ते 12 जणांनी मारहाण केली आहे. तुम्ही बाहेरुन आला आहात तिथे दुकानात लावू नका अशा प्रकारची धमकी दिली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काहीजण जखमी देखील झाली आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचं चित्र पाहयला मिळत आहे. कुठं खून तर कुठं गोळीबार तर कुठं मारहाण अशा घटना घडताना दिसत आहेत. अशा घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे.
दोन दिवसापूर्वीच पुण्यात कुख्यात निलेश घायवळ टोळीनं घातला होता धुमाकूळ
गेल्या दोन दिवसापूर्वीच कुख्यात निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीने पुण्यात धुमाकूळ घातला होता. सलग दोन गंभीर गुन्हे केले आहेत. कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात प्रथम 36 वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने (Pune Crime News) वार करून हल्ला करण्यात आला. एका रात्री दोन रक्तरंजित कृत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड, गणेश राऊत यांच्यासह आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. सर्व पाचांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ गाडीला साईड न दिल्याच्या कारणावरून धुमाळ यांच्यावर गोळीबार झाला, तर सागर साठे यांच्यावर कोणतेही कारण नसताना फक्त दहशत पसरवण्यासाठी कोयत्याने वार करण्यात आला.मागील काही दिवसांपासून शांत असलेली घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे. या घटनेत निलेशचा काही हात आहे का? याचा पोलिस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: