Pune Crime News : पुण्यातील टिंगरेनगर भागात एक संतापजनक घटना घडली आहे. बिगारी काम करणाऱ्या एका कामगाराकडून विकृतीचा प्रताप समोर आला आहे. या कामगाराने मादी श्वानावर अत्याचारकेल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सी सी टिव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होन्नापा हा मिस्त्री असून ठिकठिकाणी तो बिगारी म्हणून काम करतो
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून टिंगरेनगर भागातील मास्टर कॉलनी मध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहण्यास आहेत. होन्नापा अमोधीसिध्द होस्मानी या नावाचा एक व्यक्ती फिर्यादी यांच्या घरासमोर वास्तव्यास आहे. होन्नापा हा मिस्त्री असून ठिकठिकाणी तो बिगारी म्हणून काम करतो. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, 7 जुलै रोजी होन्नापा ने फिरस्त्या कुत्र्याला कारण नसताना मारहाण करत होता. याबाबत फिर्यादी यांनी त्याला जाब विचारला असता त्याने त्यांच्याशी भांडण केले. 3 ऑगस्ट रोजी फिर्यादी यांच्या आईने पाहिलं की होन्नापा हा एका फिरस्त्या कुत्र्याला उचलुन एका पत्र्याच्या रुममध्ये घेऊन गेला. फिर्यादी यांच्या आईने त्या पत्र्याचे रुमकडे गेले असता त्याने त्या कुत्रीला तिथून सोडून दिले. यावरुन संबंधित व्यक्ती हा मादी कुत्र्यावरती अत्याचार करून तिचा छळ करत असल्याचे दिसून आलं. याअगोदर देखील त्या व्यक्तीने मादी कुत्र्यावरती अत्याचार करुन त्यांचा छळ केलेले असल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे.
आरोपीने यापूर्वी बऱ्याच वेळा कारण नसताना भटक्या कुत्र्यांना मारहाण केली आहे
आरोपीने यापूर्वी बऱ्याच वेळा कारण नसताना भटक्या कुत्र्यांना मारहाण करुन क्रुरतेची वागणुक दिलेली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. तक्रारदार आणि ॲड रागिणी मोरे यांनी या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर विमानतळ पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात विकृत कृत्य करणाऱ्या व्यक्तिविरोधात संताप
बिगारी काम करणाऱ्या एका कामगाराने असे विकृत कृत्य केल्यामुळं पुण्यात त्या व्यक्तिच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील सद्या लोकांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
बीडमधील दहशतीचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल; कोयते, सत्तुराने तरुणावर वार, अश्लील शिवीगाळ
