पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन चांगलच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे देखील भोंदूबाबा अशोक खरातसोबत फोटो व्हायरल झाले आहेत. रुपाली चाकणकरयांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली चाकणकरांना टार्गेट केलं जातंय. त्यांच्याविरुद्ध पुरावे असतील तर कारवाई करावी मात्र नाहक बदनामी करु नये असे शिंदे म्हणालेत.  पाद्यपुजा करण्यात काहीही गैर नाही असंही ते म्हणालेत. वेळ आली तर आमच्या पक्षात रुपाली चाकणकरांना घेण्यासाठी मी शिफारस करेन असे शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले अरविंद शिंदे? 

रुपाली चाकणकरांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावे असतील तर कारवाई करावी मात्र नाहक बदनामी करु नये असे अरविंद शिंदे म्हणालेत.  पाद्यपुजा करण्यात काहीही गैर नाही,  तो परंपरेचा भाग आहे असंही ते म्हणालेत. एकट्या रुपाली चाकणकरच का? खरातचे फोटो अनेकांसोबत आहेत. हे गृहखातं आणि मुख्यमंत्र्यांचही अपयश असल्याचे अरविंद शिंदे म्हणाले. रुपाली चाकणकरांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. त्यांच्या पक्षात त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. आमच्या पक्षात मी एकटा निर्णय घेत नाही. मात्र वेळ आली तर आमच्या पक्षात रुपाली चाकणकरांना घेण्यासाठी मी शिफारस करेन असं सूचक वक्तव्य अरविंद शिंदे यांनी केलं आहे. 

एखाद्या व्यक्ती सोबत फोटो असतील तर तो गुन्हा आहे का? : रुपाली चाकणकर

एखाद्या व्यक्ती सोबत फोटो असतील तर तो गुन्हा आहे का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केला आहे. सध्या निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची पुराव्यासह उत्तर देणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. नुकतीच रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईत भेट घेऊन प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर चाकणकर आता पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. पुण्यात जाऊन त्या सुनेत्रा पवार यांची देखील आजच भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

Continues below advertisement

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अन्यथा उपोषणाला बसणार : लक्ष्मण हाके

सुनेत्रा पवारांनी रूपाली चाकणकर यांचा उद्या दुपारी बाजार बारा वाजेपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषणाला बसू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. तसेच महायुतीने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप देखील ओबीसी आरक्षणावरून हाके यांनी केला आहे. सातारा जिल्हा परिषदेवरती ओबीसींना डावलून अध्यक्ष बसवला त्यामुळे आम्ही जयकुमार गोरे यांना ओबीसीचे नेता मानत नाही. छगन भुजबळ ओबीसी चे नेते आहेत. पण ते का शांत आहेत हे देखील आम्हाला समजत नाही. बारामतीची निवडणूक आम्ही लढणार असल्याचे लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असतील तर तो गुन्हा आहे का? पुराव्यासह सगळी उत्तर देणार, रुपाली चाकणकरांची माहिती