Pune Chandani Bridge Update: पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल काल रात्री जमीनदोस्त झाल्यानंतर पुणेकर आणि मुंबई-बंगळुरू मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल पाडून जवळपास 10 तास उलटल्यानंतर आता वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अजूनही तिथले ढिगारे हटवण्याचं काम सुरूच आहे. मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेनं अवजड वाहनं चांदणी चौकापर्यंत आणून थांबवली होती. आधी या वाहनांना एका बाजूने वाट मोकळी करुन देण्यात आली आहे. तर अन्य वाहनांना तूर्त पर्यायी मार्गावरून पाठवण्यात आलं होतं. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.


पुण्यातल्या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातला पूल रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी जमीनदोस्त झाला. गेले अनेक दिवस पूल पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पुलाला 1 हजार 300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटकं भरण्यात आली होती. जय्यत तयारी करून आणि सर्व खबरदारी घेऊन रात्री एक वाजल्यानंतर पूल पाडण्याचं काऊंटडाऊन सुरु झालं आणि पुणेकरांची कोंडी करणारा हा पूल क्षणभरात उद्ध्वस्त झाला. पूल पाडल्यानंतर ढिगारे हटवण्याचं काम सुरु झालं. काही तासांत रस्त्यावरील ढिगारे हटवण्याचं काम पूर्ण झालं. आता रस्त्याच्या बाजूचे ढिगारे उचलण्याचं काम सुरु आहे. 


पूल पाडल्यानंतर गेल्या दहा तासांहून अधिक काळ तिथला राडारोडा हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीनं हे काम सुरु आहे. स्वतः जिल्हाधिकारी या कामावर लक्ष ठेवून आहेत. 


पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल पाडल्यानंतर तब्बल 10 तासांनी ढिगारे हटवण्यात आले आणि वाहतूक दोन्ही बाजूंनी सुरु करण्यात आलीय.  त्यानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावरची वाहतूक सुरु करण्यात आली. पूल पाडण्याआधी या चांदणी चौकातील वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल 11 तास बंद असलेली वाहतूक अखेर सुरु करण्यात आली.  


लवकरच या ठिकाणी पूल बांधण्याचं काम सुरु होणार


स्फोटानंतर पुलाजवळ काही वेळ केवळ धुळीचे लोटच दिसत होते. जय्यत तयारी करून आणि सर्व खबरदारी घेऊन रात्री एक वाजल्यानंतर पूल पाडण्याचं काऊंटडाऊन सुरु झालं अन् हा पूल क्षणभरात उद्ध्वस्त झाला. पूल पाडल्यानंतर ढिगारे हटवण्याचं काम सुरु झालं. काही तासांत हे ढिगारे हटवण्याचं संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. यानंतर लवकरच या ठिकाणी पूल बांधण्याचं काम सुरु होणार असल्याचं देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Chandani Chowk : पूल पडताना पाहण्यासाठी सतरंज्या, चटया अन् खुर्च्या घेऊन या, पुणेकरांच्या भन्नाट सूचना 


Pune Bridge : अखेर चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त; मलबा हटवण्याचं काम प्रगतीपथावर, वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता