पुणे : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका (Elections) नव्या याद्याप्रमाणे घ्याव्यात असे मत अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी व्यक्त केले आहे. राज्य निवडणूक आयोग निवडणूक घेणार आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील असे सरोदे म्हणाले. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने केंद्राकडे त्या यादींची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आश्चर्यकारक निकाल लागल्याचे सरोदे म्हणाले. त्यामुळं निवडणूक याद्या परत तयार करायला हव्यात असेही सरोदे म्हणाले.
मतदान प्रक्रिया प्रामाणिकपणे व्हायला हवी
राज्य निवडणूक आयोगाला याद्या देणे चुकीचे ठरणार असल्याचे सरोदे म्हणाले. मतदान प्रक्रिया प्रामाणिकपणे व्हायला हवी. न्यायालयाने चार महिन्यात निवडणूक घ्या असे सांगितले आहे. निवडणूक याद्या परत तयार करायला हव्यात असेही सरोदे म्हणाले. मतदार संख्या 9.73 कोटी वरुन 9.80 कोटी झाली असेल तर नवे मतदार झाले आहेत. जुन्या मतदार याद्यानुसार मतदान झालं तर नवीन मतदारांना मतदान करता येत नाही असेही सरोदे म्हणाले. त्यामुळे नव्याने याद्या तयार व्हायला हव्यात. 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 100 मतदार संघाबाबत याचिका दाखल आहेत. 2024 निवडणुका ज्या पक्षाने जिंकल्या यामध्ये ईव्हीएमचा वापर चुकीच्या पद्धतीने त्या पक्षाने केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस