Pune Bullock Cart Race :  देव तारी त्याला कोण मारी, अशी एक आपल्याकडे प्रसिद्ध म्हण आहे. असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाग घडला आहे. बैलगाडा शर्यतीत घोडीवरुन पडला, त्यानंतर धावत्या बैलगाड्यांखाली गेला पण सुखरूप बचावाला आहे. मुक्या प्राण्यांच्या समय सूचकतेने युवकाचे प्राण वाचले आहेत.  

नेमकं काय घडलं?

आंबेगाव तालुक्यातल्या विठ्ठलवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतील एक काळजाचा थरकाप उडविणारा क्षण पाहायला मिळाला. या शर्यतीत महाळुंगे पडवळ येथील विभांशराजे विशाल पडवळ आणि रामनाथ बांगर यांचा बैलगाडा घाटात धावत असताना बैलगाड्यासमोर पळणाऱ्या घोडीवर बसलेला अनिकेत चिखले हा युवक तोल जाऊन बैलगाडा घाटातच खाली पडला. मागून भरधाव वेगात येणाऱ्या बैलांच्या व बैलगाड्याच्या खाली आता घोडेस्वार अनिकेत सापडणार व त्याला मोठी दुखापत होणार असेच क्षणभर सर्वांना वाटले होते. पण अनिकेतला घाटात पडलेले पाहून भरधाव वेगात धावत येणाऱ्या बैलांच्या दोन्ही जोड्यांनी आगदी बिलगाड्यासह अनिकेत वरून उडी मारली आणि मोठी दुर्घटना टाळली. या अपघातात अनिकेत बचावल्याने बैलांच्या समय सूचकतेची व मुक्या प्राण्यांच्या माणसांप्रती असणाऱ्या सद्भावनांची सर्वत्र चर्चा होत आहे.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीची (Bailgada Sharyat)  परंपरा असून असंख्य हजारो बैलगाडा प्रेमी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना दिसून येतात. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. विशेषत: आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात येत असते. या बैलगाडा शर्यतीदरम्यान, अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडतात. अशीच एक घटना आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी गावात घडली. पण यामधून तरुण सखरुप बचावला आहे. महाळुंगे पडवळ येथील विभांशराजे विशाल पडवळ आणि रामनाथ बांगर यांचा बैलगाडा घाटात धावत असताना बैलगाड्यासमोर पळणाऱ्या घोडीवर बसलेला अनिकेत चिखले हा युवक तोल जाऊन बैलगाडा घाटातच खाली पडला. आता घोडेस्वार अनिकेत सापडणार व त्याला मोठी दुखापत होणार असेच क्षणभर सर्वांना वाटले होते. पण अनिकेतला घाटात पडलेले पाहून भरधाव वेगात धावत येणाऱ्या बैलांच्या दोन्ही जोड्यांनी आगदी बिलगाड्यासह अनिकेत वरून उडी मारली आणि मोठी दुर्घटना टाळली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik Bullock Cart : नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीला गालबोट, बैलगाडा शर्यत बघणं बेतलं जीवावर, काय घडलं नेमकं?