आधी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप, आता मानले आभार, गौतमीने घेतली रिक्षा चालकाच्या मुलीची भेट
पुण्यातील सिंहगड रोडवर घडलेल्या एका कारने रिक्षाला जबर धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर गौतमी पाटील चर्चेत आली होती.
Gautami Patil : पुण्यातील सिंहगड रोडवर घडलेल्या एका कारने रिक्षाला जबर धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर नृत्यांगणा गौतमी पाटील चर्चेत आली होती. कारण ती कार गौतमी पाटीलची होती, मात्र, अपघातावेळी ती त्या कारमध्ये नव्हती. दरम्यान, मालक असलेल्या गौतमीने मदत न केल्यामुळे संबंधित रिक्षा चालकाच्या मुलीने गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते. मात्र आता तीच मुलगी गौतमी पाटीलसोबत दिसून आली आहे. इतकच नाही तर तिने गौतम पाटीलचे आभार देखील मानले आहेत.
गौतमी पाटील हिच्या गाडीला 30 सप्टेंबरला अपघात झाला होता
गौतमी पाटील हिच्या गाडीला 30 सप्टेंबरला अपघात झाला होता. या अपघातात एक रिक्षाचालक जखमी झाला होता. त्यानंतर गौतमी पाटील वर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. गौतमी पाटीलने आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यांनी आम्हाला येऊन भेटावं त्यांनी आमची कोणतीही ही मदत केली नाही असे आरोप गौतमी पाटीलवर रिक्षा चालक यांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर काल संध्याकाळी गौतमी पाटील हिने रिक्षा चालकाची मुलगी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यानंतर कुटुंबीयांनी गौतमी पाटील चे आभार मानले आहेत.
अपघातानंतर माझा मानलेला भाऊ त्या कुटुंबीयांशी भेटायला गेला होता. त्याने मदतीचा हात देखील पुढे केला होता. मात्र, कुटुंबियांनी आणि कायद्यानुसार जाऊ असे सांगितले आणि आमची मदत नाकारल्याचे गौतमी पाटील म्हणाली. त्याच्यानंतर मी त्या कुटुंबीयांच्या संपर्कात नाही, मी देखील त्यांच्यासोबत कायद्यानुसारच संपर्क साधणार असल्याचेही ती म्हणाली. इथून पुढे त्या कुटुंबीयांना जाऊन मला भेटायची इच्छा आहे, मात्र त्यांनी या तीन चार दिवसात जी काही माझी मीडियासमोर बदनामी केली आहे, त्यामुळं मी आता त्यांना कायद्यानुसारच उत्तर देणार असल्याचे गौतमी पाटील म्हणाली होती.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला एका वाहनाने धडक दिली होती. ते वाहन गौतीमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी गौतमी पाटीला या अपघात प्रकरणी नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. या अपघाताच्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. मात्र, रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना (Pune Police) दिल्या होत्या. यानंतर पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. त्यामुळे गौतमी पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
























