मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेलं जनसुरक्षा विधेयक (Public Security Act) आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल 9 जुलै रोजी विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला होता. विरोधकांच्या आक्षेपानंतर या विधेयकात काहीसे बदल करण्यात आले आणि ते विधानसभेत मांडण्यात आलं. सुरुवातीला हे विधेयक एकमताने समंत झालं असं अध्यक्षांनी म्हटलं होतं. मात्र, विनोद निकाले यांचा विरोध असल्याने नंतर ते बहुमताने संमत झालं अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या विधेयकाचं काही विरोधकांनी स्वागत केलं तर काही जणांनी विरोध केला आहे. हिंसक कारवाईला आळा घातला पाहिजे असे मत विरोधकांनी व्यक्त केले. मात्र, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी या बिलाला विरोध केला आहे. या बिलाचा गैरफायदा होऊ शकतो म्हणून मी या बिलाला विरोध करतोय असे निकोले म्हणाले.
जनसुरक्षा विधेयकावर नेमकं कोण काय म्हणाले?
भास्कर जाधव
देशाच्या सुरक्षेसाठी हा कायदा सर्वांना करण्याच्या सूचना असतील तर ज्या ठिकाणी भाजपच सरकार आहे त्या ठिकाणी का नाही? याच उत्तर द्यावे असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. देशात सर्वच ठिकाणी माओवाद नाही. आठ राज्यात होता. त्यापैकी पाच राज्यात शिल्लक आहे.त्यापैकी चार राज्यांनी केला आहे. आता आपणही करतोय असे जाधव म्हणाले.
नितीन राऊत यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक
रस्ता अडवला, मोर्चा काढला तरी हा कायदा लागू होईल का ही शंका असल्याचे मत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी व्यक्त केलं. भाषण स्वातंत्र्याचा अधिकार मोडीत निघणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात अशाच पद्धतीने अनेकांना अटक करण्यात आली आहे. पंढरपूरच्या वारीत शहरी नक्षली असल्याचा आरोपही काहींनी केला आहे. गडचिरोलीतील नक्षलवाद कमी करण्यात आपण मोठं काम केलं असे म्हणत नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
ज्या तक्रारी आल्या त्यातील किती स्वीकारल्या हे कळत नाही : रोहित पवार
ज्या तक्रारी आल्या त्यातील किती स्वीकारल्या हे कळत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. विधेयकाच्या शीर्षकात बदल केला आहे. आपण सर्वजण नक्षलवादाच्या विरोधात आहोत. कडव्या आणि डाव्या याची व्याख्या कळवावी असेही रोहित पवार म्हणाले.
या बिलाचा गैरफायदा होऊ शकतो म्हणून विरोध : विनोद निकोले
डाव्या पक्षाचा मी एकच आमदार आहे. हिंसक कारवाला आळा घातला पाहिजे असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी व्यक्त केले. मकोका कायदा आहे, युएपीए कायदा आहे. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवला आहे. या बिलाचा गैरफायदा होऊ शकतो म्हणून मी या बिलाला विरोध करतोय असे निकोले म्हणाले.
हे बिल शुद्ध भावनेने आलेले नाही : अंबादास दानवे
हे बिल शुद्ध भावनेने आलेले नाही. आपल्या राज्यात अनेक कायदे आहेत त्यामुळे या कायद्याची गरज नाही असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. अर्बन नक्षल हा नवीन शब्द या कायद्यात वापरला जात असल्याचे दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: