एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: तत्कालिन सरकारने मालेगाव खटला ATS कडे दिला, केंद्राने खटला NIA ला दिला, 2014 पासून शाहांनी NIA चालवलं, कोर्टानं सांगितलं पुरावा नाही; पृथ्वीराज बाबांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांनी मालेगाव प्रकरणी निकाल आल्यानंतर भाजपची प्रतिक्रिया पाहून गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? अशी विचारणा केली होती.

Prithviraj Chavan: मालेगाब बाॅम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी हा खटला तत्कालिन सरकारने एटीएसकडे दिला होता. त्यांनी काही लोकांना अटक केली. त्यानंतर केंद्र सरकारने हा खटला एनआयएकडे दिला होता. 2014 पासून अमित शाह एनआयए चालवतं आहे, कोर्टाने खटल्यानंतर सांगितले पुरावा नाही, कोर्टाने ब्लास्ट झाला हे सांगितले, पण कोणी केला हे सांगितले नाही. हे काम भारत सरकारने करायला हवे, मुद्दाम कमी पडले असे म्हणावे, तर माझ्याकडे पुरावा नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी मालेगाव प्रकरणी निकाल आल्यानंतर भाजपची प्रतिक्रिया पाहून गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? अशी विचारणा केली होती. तसेच त्यांनी भगवा दहशतवाद उल्लेख चुकीचा म्हणत 'सनातन टेरर' शब्द वापरला होता. तेव्हापासून भाजपकडून त्यांच्याविरोधात जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण यांच्याविरोधात शिंदे गटाकडून आंदोलनही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शाहांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. 

तपास यंत्रणांवर दबाव आहे का? पाहायला हवं 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,  दहशतवाद हा दहशतवाद आहे त्याला धर्माचे लेबल लावू नका. एकाचवेळी निकाल आले हा विषय वेगळा आहे. मुंबई ट्रेन साखळी बाॅम्बस्फोट आणि मालेगाव या दोन्ही खटल्यामध्ये वरच्या न्यायालयात दाद मागायला हवी, असे ते म्हणाले. तपास यंत्रणांवर दबाव आहे का? पाहायला हवं, असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मालेगाव ब्लास्टबद्दल मुख्यमंत्री काही बोलणार नाहीत. कारण याबाबत दिल्लीचे नियंत्रण आहे. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना बोलत येणार नाही. 

खंडणीला राजाश्रय मिळाला

राज्यात उद्योगांवरूनही चव्हाण यांनी तोफ डागली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात उद्योग का येत नाही? बीडची घटना का घडली तर दोन कोटीची खंडणी दिली नाही. पुण्याच्या औद्योगिक प्रकल्पात खंडणी सुरू आहे. अजित पवारांच्या गय केली जाणार नाही या वक्तव्याचे स्वागत करतो. खंडणीला राजाश्रय मिळाला असून मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलला कारवाई होऊ शकते. कुठलाही गुंड राजाश्रय असल्याशिवाय रोखठोक काम करू शकत नाही. खंडणीखोरांचा बंदोबस्त फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करू शकतात, असे ते म्हणाले.  नेहरूंना मुंबई गुजरातला द्यायची होती हे मूर्खपणाचे वक्तव्य आहे. नेहरुंनी एकभाषिक राज्यासाठी गळ घातल्याचे ते म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 105 जणांनी बलिदान दिलं असून हे वक्तव्य चुकीचं असल्याचे ते म्हणाले. 

थातुरमातुर कारवाई करत खाते बदलले

कोकाटेंवरील कारवाईवरूनही चव्हाण यांनी टीका केली. त्यांनी सांगितले की, माणिकराव कोकाटे रमी खेळताना लोकांना दिसले. त्यानंतर लाजेखातर त्यांचे खाते काढले. निवडणुकीपूर्वीचे वायदे विसरले असून मुख्यमंत्र्यांनी थातुरमातुर कारवाई करत खाते बदलले आहे. अनेक प्रकरणे दडपली जात आहेत. काही दिवसांनी मंत्रिमंडळातून काढून टाकणार सांगितले जात आहे. रमी सवय लागणार गोष्ट आहे म्हणतात, आदत लग सकती हे म्हणतात. ऑनलाईन जुगार हा मोदींनी सुरू केला. 'चंदा लो' मुळे हे सुरू झाले आहे. इतर राज्यांनी जुगार बंद केला आहे. तुमच्या राज्यातही धाडसी निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली. 
 
इतर महत्वाच्या बातम्या
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!

व्हिडीओ

Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Embed widget