परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तळगाळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यात त्यांचा मन की बात कार्यक्रम प्रसिद्ध आहे. यात देशातील कानाकोपऱ्यातील लोकांच्या कामाचं कौतुक पंतप्रधान करताना दिसतात. असाच आणखी एक गोष्ट पंतप्रधान करतात ती म्हणजे लोकांच्या पत्रांना उत्तरं पाठवणे. असेच एक पत्र महाराष्ट्रातील परभणी येथील सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याला मिळाले आहे.
अजयने पंतप्रधान मोदी यांना एक रेखाचित्र पाठवून पत्र लिहिले होते. या पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी अजयला लिहिले, ‘वास्तविक चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नाळू विचारांना साकार करते. या शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्भुत आहे. ’
पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये : सुप्रिया सुळे
त्याचबरोबर अजयचे मनोबल वाढवताना पंतप्रधानांनी पत्रात पुढे लिहिले आहे, ‘तुझ्या कलाकृतीबरोबरच, पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना, तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करते. पंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला कि तो त्याच्या या कलेचा वापर समाजात जागरूकता आणण्यासाठी करू शकतो. त्यांनी पत्रात लिहिले आहे, ‘तू तुझ्या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्दयांप्रति सजग करण्याचा प्रयत्न करशील अशी मी आशा करतो.’ पत्रात मोदींनी अजयला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात, असा असेल सीरम इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रम
तत्पूर्वी अजयने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांगितले होते कि त्याला चित्र काढायला खूप आवडते. अजयने लिहिले होते कि त्याचे चित्रकलेचे एक वेगळेच विश्व आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून तो आपले विचार प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायची इच्छा असल्याचे अजयने पत्रात लिहिले होते.
PM Modi | पंतप्रधान मोदींचं मिशन वॅक्सिन, काही वेळातच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार