President Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind) आज एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर (Raigad Fort) आहेत. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं.
राष्ट्रपतींच्या खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली होतीॉ. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, "राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे."
खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचं वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत राष्ट्रपती कार्यालयाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपतींची रायगड भेट ही गौरवास्पद बाब असल्याचं खासदार संभाजीराजेंनी नमूद केलं आहे.
या दौऱ्यादरम्यान ते रायगडावर हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, शिवप्रेमींनी रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे राष्ट्रपतींनी रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रोपवेने रायगडावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यावेळी आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात
दरम्यान त्यांच्या या दौऱ्यावेळी आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. पर्यटकांना आजूबाजूच्या परिसरातही प्रवेश नाकारण्यात येणार आहे. पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनानं पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच याबाबतचे आदेश जारी केले होते. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रायगडावर लगबग सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील तयारीची पाहणी केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. त्यासाठी हेलिपॅडही तयार करण्यात आला होता. उडत असल्याने 25 वर्षांपूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हेलिपॅड होते. मात्र हॅलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती उडायची. त्यामुळे शिवप्रेमींनी 1996 साली उपोषण केले. त्यानंतर हा हेलिपॅड काढून टाकण्यात आला होता.
तब्बल 35 वर्षींनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत आहेत. तब्बल 35 वर्षींनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत. या आधी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 साली किल्ले रायगडावर आल्या होत्या. त्यावेळा त्यांनी राज सदरेत मेघ डंबरी उभारण्याची सूचना केली होती. त्यानूसार मेघ डंबरी 1985 साली बांधुन पूर्ण झाल्यावर तिच्या लोकार्पण सोहळ्यास तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह किल्ले रायगडावर आले होते. त्यानंतर आज भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येणार असल्यामुळे किल्ले रायगड आणि परीसराला लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी विविध स्तरांवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई विमानतळावरून भारतीय वायूदलाच्या MI17 हेलिकॉप्टरमधून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावात निर्माण केलेल्या हेलीपँडवर उतरतील. त्यानंतर रोप वे च्या माध्यमातून राष्ट्रपती किल्ले रायगडावर पोहचतील.