मुंबई : राज्यातल्या अनेक भागांत काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात रात्री तासभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे.


घनसांगवीमध्ये मुसळधार पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.  तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, बांदा, दोडामार्ग भागात रात्री  मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

तर धुळ्यातही काल ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसानं जोरदार हजेरी लावली. तब्बल अर्धा तास कोसळलेल्या वादळी पावसानं ग्रामीण भागासह शहरी भागांतला वीजपुरवठाही ठप्प झाला होता.

नाशिकमध्येही काल अनेक ठिकाणी गारांसह मुसळधार पाऊस झाला. तर मनमाड, नंदुरबार, धुळे आदी ठिकाणीही पावसाने दमदार हाजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करावा लागला होता.