Pravin Gaikwad Case: अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर कुटुंबादेखत शाई ओतून हल्ला झाला. फत्तेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथे आले असता हा प्रकार घडला. या हल्ल्याचा विरोधकांनी निषेध केला आहे. मात्र, आरोपी विरोधात दाखल गुन्हा जामीनपात्र असल्याने कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांनी दिली आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई होईल
यामावार यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणातील आरोपींवर प्रतिबंधत्मक कारवाई केली जाणार आहे. मात्र, घटनास्थळावरून पोलिसानी दोन आरोपीना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर आज प्रतिबंधत्मक कारवाई होईल. जन्मजेयराजे भोसले यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवीण गायकवाड अक्कलकोटला आले होते. त्यांनी पुढे सांगितले की, बंदिस्त हॉलमध्ये कार्यक्रम असल्याने कोणत्याही परवानगीची आवश्यकता नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसानी वेगळा बंदोबस्त दिलेला नव्हता. घटनेनंतर पोलिसानी तत्काळ दखल घेत आरोपी विरोधात कारवाई केली आहे. सात आरोपींविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात असलेले सर्व कलम हे जामीनपात्र आहेत. जे जखमी आहेत त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी झाली आहे. तपासणी अहवालात जर गंभीर जखम असल्याचे समोर आल्यास गुन्ह्यातील कलमामध्येवाढ करण्यात येईल. गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून चांगली वर्तवणूक केली जाईल असे लिहून घेतलं जाईल. आरोपींना अटक केलेली नाही, पुन्हा घटना होऊ नये यासाठी त्यांना तब्यात ठेवलं आहे. त्यामुळे व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा प्रश्न नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीनी आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही. जर त्यांची आणखी काय तक्रार असेल तर त्या पद्धतीने कारवाई केली जाईल.
आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का?
दम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या X हँडलवर लिहिले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे, आणि बहुजन समाजासाठी झटणाऱ्या शिवश्री प्रविणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. मुख्यमंत्री फडणवीस “महाराष्ट्र आता थांबणार नाही”म्हणाला होता, आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का? या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या झुंडीवर जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणेची काही तरतूद आहे का? असेल तर त्याअंतर्गत कारवाई करून आदर्श घालून द्या! महाराष्ट्र पाहतोय.
सुप्रिया सुळे यांनीही निषेध केला
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, "महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. हे सर्व खूप दुःखद आहे आणि या घटनेचा कितीही निषेध केला तरी पुरेसा होणार नाही. हे निंदनीय कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे आम्हाला वाटते."
इतर महत्वाच्या बातम्या