एक्स्प्लोर

प्रवीण गायकवाडांवरील हल्ला सरकार पुरस्कृत, राष्ट्रवादीचा संताप, मिटकरीही संतापले; शिवरत्न शेटेंकडून सत्कार

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली आहे. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेवर अनेकांनीी संतपा व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. प्रशांत कोरटकर वेळी हे हल्लेखोर कुठे होते? असा सवाल मिटकरींनी केला आहे. 

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याचा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणुन निषेध व्यक्त करतो. प्रशांत कोरटकर वेळी हे हल्लेखोर कुठे होते? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. 

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत : प्रशांत जगताप

बहुजन चळवळीतील कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत आहे असा थेट आरोप शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे. सरकारने तातडीने आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असताना सोलापूर पोलीस काय करत होते? असा सवाल त्यांनी केला आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध प्रशांत जगताप यांनी केला.

शिवरत्न शेटे यांनी केला प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार

अक्कलकोटमध्ये काळे फासण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे. शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी सत्कार केला  आहे. झालेल्या घटनेसंदर्भात विषयावर आत्ताच बोलणार नाही. योग्यवेळी प्रत्युत्तर दिल्यानंतर आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडतो असे शेटे म्हणाले. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी डोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी डॉ. शिवरात्न शेटे यांच्या हॉस्पिटलला आले आहेत. 

प्रविण गायकवाड यांच्यावरील झालेल्या भ्याड कृत्यामागील मास्टरमाईंडचा पोलिसांनी शोध घ्यावा : रोहित पवार 

बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचं खूप मोठं कार्य प्रविणदादा गायकवाड यांच्या हातून होत आहे. अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना? याचाही तपास झाला पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे. त्यामुळं या भ्याड कृत्यामागील मास्टरमाईंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा. आम्ही सर्वजण प्रविणदादा गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत असे रोहित पवार म्हणाले.

ज्यांना विचारांचा सामना विचारांशी करता येत नाही ते असे विकृत कृत्य करतात : विकास लवांडे 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड शाईफेक हल्ल्याचा तीव्र निषेध. प्रविणदादांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्यासाठी आणि बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहे. त्यांच्या अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांचे मुखवटे उघडे पाडले आहे आणि हीच खरी चीड आहे हया विकृतांना. आजवर कोरटकर, छिंदम, कोश्यारी, सोलापूरकर, दानवे अशा अनेकांनी छत्रपती  शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांच्या विरुद्ध लिखाण केले आणि त्यावर गप्प बसणारे हे अशा हल्ल्यांना खतपाणी घालत आहे. हे हल्लेखोर कोणी शिवप्रेमी किंवा शिवभक्त नसून गुंडाची टोळी आहे ज्यांना विचारांचा सामना विचारांशी करता येत नाही ते असे विकृत कृत्य करतात. या भ्याड कृत्यामागे कोण आहे, कोणत्या पक्षाशी संबंधित आहे याचाही तपास झाला पाहिजे. मास्टरमाईंडचा पर्दाफाश होणं आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केले. पुरोगामी विचारांचा आवाज दाबण्यासाठी सरकार ‘जनसुरक्षा कायदा’ वापरतं आणि आता विचारवंतांवर हल्ले होत आहे हे त्याच साखळीतील पाऊल आहे. सरकारने तात्काळ या विकृतीचा, या गुंडांचा व यांच्या मागे असणाऱ्या सूत्रधारांचा बंदोबस्त करावा. प्रविणदादा, आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत असे विकास लवांडे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Video: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई; अक्कलकोटमध्ये गोंधळ

 

महत्त्वाच्या बातम्या

Saamana Agralekh : महाराष्ट्र, बंगालसह सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास; दिल्लीतील व्यापार मंडळाने शौर्य, स्वाभिमानाची जणू सुंताच केलीय; 'सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊतांचा प्रहार
महाराष्ट्र, बंगालसह सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास; दिल्लीतील व्यापार मंडळाने शौर्य, स्वाभिमानाची जणू सुंताच केलीय; 'सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊतांचा प्रहार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Omraje Nimbalkar: 'ऑपरेशन टायगर' अन् ओमराजेंचे मौन! शिवसेना पक्षप्रवेशाचा सस्पेन्स आता 'त्या' ऐतिहासिक निकालावर अवलंबून? माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून पूर्णपणे ठेवलं अंतर
'ऑपरेशन टायगर' अन् ओमराजेंचे मौन! शिवसेना पक्षप्रवेशाचा सस्पेन्स आता 'त्या' ऐतिहासिक निकालावर अवलंबून? माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून पूर्णपणे ठेवलं अंतर
Sushama Andhare: सत्तापाट सोडून आम्ही संघर्षाची वाट निवडली, जातिवंत शेतकऱ्याने पेरत जायचं असतं, ज्यांच्याकडे ती कला नाही ते...; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!
सत्तापाट सोडून आम्ही संघर्षाची वाट निवडली, जातिवंत शेतकऱ्याने पेरत जायचं असतं, ज्यांच्याकडे ती कला नाही ते...; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!

व्हिडीओ

Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरची सर्वात मोठी अपडेट
एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरची सर्वात मोठी अपडेट
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
Operation Tiger UBT Shivsena: ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला? शिवसेनेच्या वर्धापनदिनीच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला? एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Operation Tiger UBT Shivsena: आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले, एकनाथ शिंदेंनी रात्री सगळ्यांना चकवून काय केलं?
आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले, एकनाथ शिंदेंनी रात्री सगळ्यांना चकवून काय केलं?
Embed widget