Maratha Reservation: मृत मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना प्रताप सरनाईकांकडून 25 लाखांची मदत; पाच कुटुंबांना दिली मदत, धाराशिवमध्ये मदतीचे वाटप
Maratha Reservation: मुंबईतील आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या प्रत्येक मराठा आंदोलकाच्या कुटुंबीयांना स्वखर्चाने पाच लाखांचा धनादेश देण्यात आला होता.

धाराशिव: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिल्यानंतर लाखो मराठे मुंबईत दाखल झाले. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला. मात्र या आरक्षण लढ्यामध्ये पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आंदोलकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरसावले आहेत. मुंबईतील आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्वखर्चाने पंचवीस लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. धाराशिव इथं मदतीच वाटप करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांच्या कुटुंबीयांकडून सरनाईक यांचे आभार मानण्यात आले आहे. मयत मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना न्याय आणि आधार मिळावा यासाठी सरनाईक सरसावले आहेत.
मुंबईतील मराठा आरक्षण लढ्यातील या मराठा आंदोलकांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबीयांना मदत सरनाईकांकडून स्वखर्चाने पंचवीस लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. धाराशिव इथं मदतीच वाटप करण्यात आलं आहे. सतीश देशमुख राहणार वरपगाव, ता. केज, जि. बीड, विजय चंद्रकांत घोगरे राहणार टाकळगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर, अतुल खवचट राहणार केसापुरी, ता. बीड, जि. बीड, गोपीनाथ जाधव राहणार बोराळा, ता. वसमत, जि. हिंगोली, भारत यादव खरसाडे राहणार आहेर वडगाव, ता. बीड, जि. बीड यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे.
मदत देण्यात आलेल्यांची नावे -
1. सतीश देशमुख
गाव: वरपगाव, ता. केज, जि. बीड
2. विजय चंद्रकांत घोगरे
गाव: टाकळगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर
3. अतुल खवचट
गाव: केसापुरी, ता. बीड, जि. बीड
4. गोपीनाथ जाधव
गाव: बोराळा, ता. वसमत, जि. हिंगोली
5. भारत यादव खरसाडे
गाव: आहेर वडगाव, ता. बीड, जि. बीड























