Maratha Reservation : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षण अत्यंत कळीचा मुद्दा होऊन गेला आहे. एका बाजूने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचे मार्ग पत्करला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या पाठीराखांकडून, समर्थकांकडून मात्र नैराश्येपोटी आत्महत्यांची मालिकाच सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी सुद्धा आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे राज्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असंच चित्र निर्माण झालं आहे.या यादीमध्ये प्रसाद देठे नावाच्या मराठा कार्यकर्त्याची भर पडली आहे. प्रसाद देठे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत जरांगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका असा सल्ला दिला आहे.  प्रसाद यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्टी लिहिली आहे. तसेच फेसबुक लाईव्ह सुद्धा केलं आहे. या फेसबुक लाईव्हमधून त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे हे पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 


इतकेच नव्हे, तर फक्त मराठा आरक्षण मिळावे या हेतूने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटलं आहे. आपल्या आत्महत्येला कोणीही जबाबदार धरू नये असं सुद्धा म्हटलं आहे. फेसबुक लाईव्हमध्ये मराठा आरक्षण का आवश्यक आहे सांगतानाच हे सांगतान प्रभाकरनचा श्रीलंकेतील लढ्याची ही माहिती दिली आहे. त्यामुळे प्रसाद देठे यांनी हा मराठा आरक्षणाचा विषय किती खोलवर मनामध्ये घेतला होता, याची जाणीव फेसबुक पोस्टमधून येते. 



काय म्हटलं आहे फेसबुक लाईव्ह पोस्टमध्ये?


जय शिवराय, 


मराठा आरक्षणासाठी लाईव्ह येऊन बरेच दिवस झाले आहेत. नाही म्हटलं, तरी दीड ते दोन वर्ष झाली असतील. कालही नाईट ड्युटी केली होती. आजही नाईट ड्युटी आहे. तुळापूरला गेल्याने झोप झालेली नाही आणि इतरही बरीच कामे होती. आज मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगणार आहे ही जी नेहमीच मित्रांना सुद्धा सांगत आलो आहे. भारतातील शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने शेती करता येत होती, त्याच पद्धतीने श्रीलंकेतील सिंहली लोकांना शेती करता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी भारतातील केरळमधील लोकांना नेऊन श्रीलंकेला शेती करण्यासाठी नेले होते. त्यासाठी शेती करण्यासाठी स्थायिक केले. कालांतराने इंग्रज भारत आणि श्रीलंकेतून निघून गेले. मात्र, केरळमधून गेलेल्या लोकांना शंभर दीडशे वर्ष तिथंच राहिल्याने श्रीलंकाही आपली वाटू लागली. स्थायिक झालेले आम्ही इथंच राहणार, असे सांगू लागले. मात्र, श्रीलंकन लोकांनी इंग्रज गेले आहेत, तर तुम्हीही जाग असे सांगू लागले. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार, अन्याय सुरु झाले. 


तर विरोध करणारा एक तरी जिवंत राहिल का?


त्यामुळे त्याठिकाणी सशस्त्र लढा उभा राहिला. त्या लढयाचे नेतृत्व प्रभाकरनकडे होते. प्रभारकरनच्या एलटीटीईचा लढा, त्यांच्या जातीसाठी, समाजासाठी श्रीलंकन सरकारविरोधात होता. राजीव गांधींना शांतीसेना पाठवू नका असे सांगूनही राजीव गांधी यांनी पाठवली आणि परत सरकार आल्यास परत ते सैन्य पाठवतील म्हणून प्रभाकरनने राजीव गांधींची हत्या केली. अगदी त्याच पद्धतीने मराठा समाजासाठी शांततेत 58 मोर्चे निघाले. किती मुलांनी आत्महत्या केल्या. लाखोंच्या मोर्चाला एकही चेहरा, नेता नव्हता. जरांगे पाटील नेतृत्व त्यावेळी नव्हते.  त्यामुळे जरांगे पाटील, मंगेश साबळेंसारखं नेतृत्व भेटल्यास मरायचं नाही मारायचं अस ठरवल्यास विरोध करणारा एक तरी जिवंत राहिल का? फाशी तर घ्यायचीच आहे, मरायचं आहे, तर समोरच्याला मारून का नाही घ्यायची? हा विचार करणारी भरपूर आहेत. अस झाल्यास भविष्यात सरकार नव्हे, कोणालाच ते पचणार नाही.


पंकजाताई माझ्या घरी येतील का?


त्यावेळी मराठा तरुण दहशतवादी, माओवाद्यांसारखे वागत आहेत असे म्हणू नका. जरांगे पाटील शांत नेतृत्व आहे. शांततेत आंदोलन करत आहेत, पण त्यांनी शब्द दिल्यास लाखो पोरं रस्त्यावर उतरतील. जीवाची पर्वा नसेल. समोरच्याला मारण्याच्या इराद्याने उतरतील, मग तुम्ही बघा काय करायचं? लक्ष्मण हाकेंकडे पंकजाताई गेल्या, पण चारवेळा उपोषणाला बसून पंकजा ताई अंतरवाली सराटीत गेल्या नाहीत. कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्यानंतर ताई त्यांच्या घरी गेल्या. ठिक आहे सांत्वन करण्यासाठी गेल्या पाहिजेत. उद्या मी मेलो, तर पंकजाताई माझ्या घरी येतील का? मलाही तीन लेकरं आहेत. ताई, बबनराव तायवाडे, लक्ष्मण हाके, प्रकाश अण्णा शेंडगे असतील यांना आपल्या समाजाचे जे प्रश्न दिसतात ते त्यांनी इतर समाजाचे ते बघावेत. 


24 तास काम करून लेकरांचं भागत नाही


प्रसाद देठेंच सगळं चांगलं दिसतं, पण नीट बघितलं, तर ती माझी कंपनी आहे. नाईटला काम करतो, दिवसा आणि कुठं तरी काम करावं लागत आहे. तेव्हा थोडं फार लेकरांचं होतंय, 24 तास काम करून लेकरांचं भागत नाही. ही फक्त माझीच स्थिती नाही, अनेकांची हीच व्यथा आहे. माझ्या कंपनीत एका जातीचे नाहीत, अठरापगड जातीच आहेत. गावगाड्यावर मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये काहीच कटूता नाही. बीडमधील प्रश्न राजकीय आहे. बाकी ठिकाणी मराठा समाज आणि इतर समाज खांद्याला खांदा लावून दिसेल. विरोध करणाऱ्यांनी थोडा विचार केला पाहिजे. मराठ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. 
जय शिवराय


इतर महत्वाच्या बातम्या