Bachchu Kadu : शेतकरी कर्जमाफीच्या ( Loan Waive) मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या घरासमोरच आंदोलन केलं जाणार आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या उपस्थितीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन केलं जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या 11तारखेला रात्रीच्या सुमारास हे आंदोलन केले जाणार आहे.  सरकारला 100 दिवस उलटून देखील शेतकरी कर्जमाफी बाबतीत सरकार निर्णय घेत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (dcm Ajit Pawar) यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं होतं. यावरुनच प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, यामध्येसुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता. तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असं आश्वासनं दिलं होतं. मात्र, अद्यापही कर्जमाफीबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

नेमकं काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?

कर्जमाफीच्या (loan waiver ) मुद्यांवरुन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे  यांनी शेतकऱ्यांना (Farmers) सुनावलं होतं. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी कृषीमंत्री कोकाटे पाहणी करत होते, यावेळी त्यांनी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे. तसेच कर्जमाफीच्या शेतकरी साखरपुडा, लग्न करतात असं वक्तव्यही कोकाटे यांनी केलं होतं. शेतकरी 5 ते 10 वर्ष वाट बघतात तोपर्यंत कर्ज भरतचं नाहीत. सरकार शेतीमध्ये गुंतवणूकसाठी शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचे कोकाटे म्हणाले. भांडवली गुंतवणूक सरकार करत आहे. शेतकरी करतो का? असा सवाल कोकाटे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच विविध शेतकरी संघटनांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचबरोबर विरोधकांनी देखील माणिकराव कोकाटे यांनी धारेवर धरले होते. वाढता विरोध पाहता मामिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितला होती. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना तंबी दिल्याची माहिती मिळाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Manikrao Kokate : दोन दिवसांपूर्वी शेतकर्‍यांना सुनावलं, नंतर दिलगिरी; आज पुन्हा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे बळीराजाच्या बांधावर