बीड : मोबाईलचा स्फोट होऊन जखमी झाल्याच्या घटना आपण यापूर्वी पाहिल्या असतील. पण मोबाईल चार्जिंगसाठी लागणाऱ्या पॉवर बँकेचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील फर्निचर जळाल्याची घटना बीडमधील कोतवाल गल्लीत घडली आहे.
शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बाबरस कुटुंबीय यांच्या घरी चार्जिंगला लावलेल्या पॉवर बँकचा स्फोट झाला. ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी बाबरस कुटुंबीय घरी नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. पॉवर बँक चार्जिंगला लावून ते नातेवाईकांकडे निघून गेले होते.
स्फोटामुळे बॅटरीमधील सगळे पार्ट्स जळून खाक झाले. शिवाय स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील फर्निचरचंही नुकसान झालं. बाबरस यांच्या शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच आग विझवली.