दरम्यान, अमरावतीतील विकासकामांच्या प्रश्नांसाठी अमित शाह यांची भेट घेतल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले आहे. अमरावतीचा विकास या एकमेव मुद्यावर आमची चर्चा झाली, असे त्यांनी सांगितलं आहे. मात्र, त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी ‘बदल होत असतात’ अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत करत संसद गाठली आहे. या निवडणुकीत त्यांना काँग्रेस - राष्ट्रवादी महाआघाडीने पाठिंबा दिला होता.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो. मागील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांचा शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पराभव केला होता.
त्यानंतर नवनीत राणा यांनी न थांबता गेली पाच वर्ष अमरावती जिल्हा पिंजून काढला आणि आपले काम सुरु ठेवले होते. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवदीने युवा स्वाभिमान पार्टीला महाआघाडीत सामावून घेतले होते.
कोण आहेत नवनीत कौर राणा
नवनीत कौर या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. आधी त्यांनी दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख निर्माण केली होती. अमरावतीत आमदार रवी राणा यांनी 2011 साली रेकॉर्ड ब्रेक सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी स्वत: रवी राणा आणि नवनीत कौर हे विवाहबद्ध झाले होते. यावेळी तब्बल 3100 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला होता.