मुंबई : सरकारने मार्च महिन्यात मेगाभरतीची घोषणा करत बेरोजगार तरुणांना दिलासा मिळाला होता. मात्र चार महिन्यांपासून घोषणा होऊनही भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 26 ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी आचारसंहिता 19 जुलैला लागू झाली आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे मेगाभरती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची दाट शक्यता आहे.
मेगा भरतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी 16 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. शुल्क भरण्यासाठी अडचणी आल्या. आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या काळातही हजारो बेरोजगार तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरले. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाकडून कोणतेही निर्देश किंवा सूचना जिल्हा प्रशासनाला आल्या नाहीत. जिल्हा प्रशासनानेही कोणतेही मार्गदर्शन मागवले नाही. त्यातच औरंगाबाद जालना विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता 19 जुलैला लागू झाली.
फडणवीस सरकारच्या मेगा भरतीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पण ही भरती कधी होणार हा प्रश्न आहे.
औरंगाबाद जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 26 ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल. त्यामुळे मेगा भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांना आणखी तीन-चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सरकारच्या मेगाभरतीला आचारसंहितेचा फटका
शासनाने आपल्या कार्यकाळातील बेरोजगारीचा कलंक पुसण्यासाठी मेगाभरतीची दारे खुली केल्याने बेरोजगार तरुणांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र गेल्या चार महिन्यांपासून या भरती प्रक्रियेची गाडी काही पुढे सरकलेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता ही मेघा भरती विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. जिल्हा परिषदेने 2 मार्च रोजी 362 विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. शासनाच्या मेगाभरतीचा गाजावाजा पाहता ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल असे वाटले होते मात्र या भरतीचे घोडे कुठे पेंड खाऊ लागलय असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
2 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या जागांसाठी निघालेल्या जाहिरातीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता (सहायक), पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लिपिक), विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. सुरुवातीला 16 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. शुल्क भरण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या अडचणी आल्याने या साठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजेच ती 23 एप्रिल करण्यात आली.
आचारसंहितेचा ब्रेक?
11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्या अगोदर राज्यातल्या हजारो बेरोजगार तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरले. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाकडून कोणतेही निर्देश किंवा त्या संबंधीच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आल्या नाहीत. प्रशासनानेही याबाबत कोणतेही मार्गदर्शन मागवले नाही. त्यातच आता 19 जुलै रोजी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. 26 ऑगस्टपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. सप्टेंबर महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मेगाभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांना आणखी तीन-चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेची जिल्हा निहाय पदसंख्या
1)अहमदनगर- 729
2)नांदेड- 557
3)अकोला - 242
4)नंदुरबार- 332
5)अमरावती - 463
6)नाशिक -687
7)औरंगाबाद -362
8)उस्मानाबाद -320
9)बीड -456
10पालघर -708
11)भंडारा-143
12)परभणी -259
13बुलढाणा -332
14)पुणे-595
15)चंद्रपूर -323
16)रायगड-510
17)धुळे- 219
18)रत्नागिरी -466
19)गडचिरोली -335
20)सांगली -471
21)गोंदिया- 257
22)सातारा-708
23)हिंगोली-150
24)सिंधुदुर्ग-171
25)जालना -328
26)सोलापूर 415
27)जळगाव-607
28)ठाणे 196
29कोल्हापूर-552
30)वर्धा- 264
31)लातूर -286
32)वाशिम-182
33)नागपूर-405
34)यवतमाळ -505
नोकरभरतीला सध्या अडथळ्यांची शर्यत पार पडावी लागत आहे. जालना निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया किंवा त्या संबंधीची परीक्षा वगळता अन्य नोकरभरती प्रक्रिया होत नसल्याचे सांगत विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेनंतरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.
मेगाभरती निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2019 05:36 PM (IST)
सरकारच्या मेगा भरतीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -