Pimpri Chinchwad News :  पिंपरी चिंचवडमधील मोहन नगर परिसरात आज गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यानंतर स्फोटासारखा मोठा आवाज आला. जीव वाचवण्यासाठी आजू-बाजूचे लोक सुरक्षितस्थळी धावले. काही काळ दहशतीचे वातावरण पाहायला मिळालं. ही MNGL ची पाईपलाईन असून PNG गॅस आहे, अशी स्थानिकांनी माहिती दिली आहे. 

दुपारी 1 वाजण्याच्या मोहन नगरमध्ये घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पीएनजी गॅस पाईपलाईन वर असलेली दगड-माती हवेत उडाली. त्याचवेळी रस्त्यावरून दुचाकीने जणारा एका व्यक्तीच्या शरीराला दगड लागले. यामुळं त्यांना मुक्का मार लागला. यामुळं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे.