Pimpri Chinchwad :पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात आता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादीनं उडी घेतली आहे. ठेकेदारांना ज्या उपसुचनांच्या आधारे बिलं अदा करण्यात आली, त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एकही नगरसेवकांची सही नाही, असा दावा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला आहे.

Continues below advertisement

स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर केले भ्रष्टाचाराचे आरोप

स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना, सर्व पक्षीय नगरसेवकांच्या सह्यांनी बिलं अदा झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपवर पलटवार केला. या भ्रष्टाचारात भाजपचा हात आहे का? अशी शंका उपस्थित करण्यात आली. ज्या ठेकेदारांना बिलं अदा केली, ते भाजपचे आमदार महेश लांडगे आणि शंकर जगतापांचे निकटवर्तीय असणारे आहेत. असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. हे पाहता केवळ प्रवीण जैन यांची नव्हे तर ठेकेदार, सह्या करणारे नगरसेवक आणि त्यांना ज्यांनी सह्या करायला लावल्या त्या सर्वांची चौकशी करावी. अशी मागणी शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने केलीये. 

Continues below advertisement