पिंपरी चिंचवडसह नाशिकमध्ये भीषण अपघात, सख्ख्या बहिणींसह एकूण पाच जणांचा मृत्यू
Pimpri Chinchwad Accident : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज दुपारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे.
Pimpri Chinchwad Accident : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज दुपारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. धनगर बाबा मंदिरासमोर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला आज नाशिक जिल्ह्यामध्ये देखील भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दोन्ही बहिणीचा जागीच मृत्यू
दुपारी सुमारे 1 वाजून 15 मिनीटांच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृत बहिणींची नावे ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय 24) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय 20) अशी असून त्या पुण्यातील पुनावळे परिसरातील रहिवासी होत्या. अपघाताच्या वेळी दोघी बहिणी दुचाकी (एमएच 14 केएम 9968) वरुन जात होत्या. याच दरम्यान मागून आलेल्या आयशर ट्रकने (एमएच 40 डीसी 0964) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दोघींनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा ट्रक जितेंद्र निराळे (मूळ रहिवासी – मध्य प्रदेश) चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काळेवाडी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याबाबत माहिती देताना काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड - मनमाड रोडवर भीषण अपघात, आईसह दोन चिमुकल्यांचा अपघातात मृत्यू
नाशिकच्या चांदवड - मनमाड रस्त्यावर सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला होऊन या अपघातात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहचवले..तर रस्त्यावर पसरलेले ब्लॉक हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
Before You Go
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
महत्त्वाच्या बातम्या





















