भोसरीमध्ये उद्योजकाची डोक्यात हातोडा घालून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2016 01:51 PM (IST)
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी हद्दीतील एका उद्योजकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. विजय पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते शिवम एन्टरप्रायझचे मालक आहेत. भोसरी एमआयडीसीच्या सेक्टर सातमध्ये विजय पवार यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.