Phaltan Doctor Death: सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आणि मूळ बीड जिल्ह्याची रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor Death) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळून आली असून, त्यामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिल्याचेही लिहिले आहे. या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Karuna Sharma on Rupali Chakankar: करुणा शर्मा रूपाली चाकणकरांवर भडकल्या
सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी महिला डॉक्टरच्या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ही हत्या आहे. महिलांबाबतीत शासन काम करत नाही. शासन झोपलेले आहे, असे म्हणत करून त्यांनी महिला आयोगावर निशाणा साधला. महिला आयोगाच्या कार्यालयाला टाळे लावून तुम्ही फक्त राष्ट्रवादीचाच प्रचार करण्यासाठी फिरा, अशी संतप्त टीका करुणा शर्मा यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर केली. तर यातील इतर दोषींवर कारवाई करून सहआरोपी करा. मुख्यमंत्र्यांना हे करता येत नसेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील करुणा शर्मा यांनी केली.
Mehboob Shaikh on Devendra Fadnavis: मेहबूब शेख यांचा फडणवीसांवर निशाणा
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी देखील मयत डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना मेहबूब शेख म्हणाले की, ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. मुख्यमंत्री साहेब आज पोलीस स्टेशनचे उद्घाटन करायला चाललेत. संवेदनशील असतील तर त्यांना महिला डॉक्टरच्या किंकाळ्या ऐकायला येतील. खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला. यावर डीवायएसपींकडून कारवाई केली गेली नाही. मुख्यमंत्री साहेब तुमच्या खासदारांनी म्हटलं की, तुम्ही बीडच्या आहेत म्हणून हे करताय का? फिटनेस सर्टिफिकेट देत नाहीत. कुणाचे फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होते? मुख्यमंत्री महोदय. स्वराज कारखान्याचा रणजीत निंबाळकर मुकादम उचलून आणायचा. त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करायचा. फलटणचं पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन राहिलं नव्हतं ते स्वराज कारखान्याचं वसुली केंद्र झालं होतं. तुम्ही वसुली केंद्राचे उद्घाटन करायला चाललात. कारखान्याच्या बाजूला जा. 50 ट्रॅक्टर जप्त केलेले दिसतील. मुख्यमंत्री साहेब जर संवेदनशील असतील तर त्यांच्या पक्षाचे खासदार रणजीत निंबाळकर यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. पोलीस, खासदार आणि त्यांच्या पीएची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
Supriya Sule on Phaltan Doctor Death : सुप्रिया सुळेंचा पीडित कुटुंबाला शब्द
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून माहिती घेतली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी मयत डॉक्टर कुटुंबाची भेट घेतली असता मेहबूब शेख यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि कुटुंबाचे फोनवर बोलूने करून दिले. खचून जाऊ नका मी तुमच्यासोबत आहे. या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेल, असा शब्द खासदार सुळे यांनी पीडित कुटुंबाला दिला. जोपर्यंत हा तपास शेवटच्या आरोपीपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका देखील खासदार सुळे यांनी यावेळी घेतली.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा