Petrol and Diesel in Maharashtra: अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिनजीवनावर होताना दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती भडकल्या (Petrol Diesel Price Hike) असून भारतातही शुक्रवारी (15 मे) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Diesel rate) दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. दरवाढीचेआर्थिकसंकटउभंराहिलंअसतान दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुडवडा जाणवत असून बहुतांश पंपावर इंधन भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे. तर अनेक पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याने ग्राहकांचा मनस्ताप बघायला मिळतो आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अशातच बुलढाण्यात इंधन टंचाईचा सहावा दिवस असून शेतकऱ्यांनी अक्षरशः पेट्रोल पंपावर जागून रात्र काढली आहे. (Petrol- Diesel Shortage)
Buldhana Petrol Diesel Shortage: बुलढाण्यात इंधन टंचाईचा सहावा दिवस, शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर जागून रात्र काढली
बुलढाणा जिल्ह्यात अभूतपूर्व अशी इंधन टंचाई निर्माण झाली आहे आणि याचा फटका थेट आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. लवकरच मान्सूनच आगमन होणार आहे आणि त्यापूर्वी शेतीची कामे आटोपून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार आहे. मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने सहाव्या दिवशीही शेतकरी व वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर रांगेत रात्र काढली . मात्र तरीही डिझेल न मिळाल्याने अनेक शेतकरी संतप्त झाले आहेत. काल रात्री जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी फक्त 22 पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होतं. मात्र प्रत्येक ठिकाणी मोठी रांग व गर्दी असल्याने अनेकांना डिझेल मिळू शकले नाही व त्यांचा नंबर येईपर्यंत डिझेल संपलं. यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.
Washim Petrol Diesel Shortage: वाशिममध्ये सलग पाचव्या दिवशी ही वाहनचालकांच्या डीझल मिळवण्यासाठी रांगा
अशीचकाहीशीपरिस्थिती वाशिम जिल्ह्यातबघायलामिळालीआहे. वाशिममध्ये सलग पाचव्या दिवशी ही वाहनचालकांच्या डीझल मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पहावयास मिळालं आहे. काल दुपारनंतर अनेक पेट्रोल पँपावर डीझल पुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. मात्र मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने सलग पाचव्या दिवशी पंपावर रांगा पाहवयास मिळाल्या. परिणामी नागरिकांमध्येरोषबघायलामिळालाआहे.
एकीकडे डिझेलचे भाव जरी वाढले असले तरी दुसरीकडे डिझेल मिळेनासे झालंय. छत्रपती संभाजी नगरच्या ग्रामीण भागात अनेक पंप कोरडे ठाक पडलेत. ज्या ठिकाणी डिझेल आहे त्या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहनांच्या रांगा आणि दुसरीकडे कॅडच्या त्यांच्या रांगा आहेत. शेतकऱ्यांसाठी शेतीच्या मशागतीचे दिवस आहेत मात्र त्यासाठीही डिझेल मिळत नाही हे विशेष.
इतर महत्वाच्या बातम्या
