मुंबई : 1 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. 1 जानेवारी 2024 ते 20 मे 2024 पर्यंत 12 लाख 92 हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी 9 लाख 75 हजार तिकीटांची विक्री झाली होती. म्हणजेच  मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे 3 लाखाने वाढली आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत.


1 जानेवारीपासून संकेतस्थळात महत्त्वाचे बदल


दरम्यान, महाराष्ट्र राज परिवहन मंडळाची ही बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहीनी म्हटले जाते. बसमधून केलेला प्रवास हा सामान्य माणसांसाठी परवडणारा आहे. काळानुसार या बसमध्ये प्रगती होत आहे. आात स्लीपर, एसी बसेस आल्या आहेत. त्याच नुसार आता बसमधून प्रवास करण्यासाठी आरक्षणाचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे.


तसेच मोबाईल ( भ्रमणध्वनी) वर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये 1 जानेवारी 2024  पासून आमूलाग्र बदल करुन त्या अद्ययावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मुलन झाल्याने ही ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे  प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीअंतर्गत आरक्षण मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपचा वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन केले आहे. 


आरक्षण न झाल्यास काय करावे?


यसह ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास 7738087103 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी हा हा मोबाईल क्रमांक 24 तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुनदेखिल तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी 0120-445656 या दुरध्वानीर संपर्ख करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  


 


विराट-अनुष्काची शेअर बाजारात जबरदस्त बॅटिंग, 'ही' आयडिया लावून झटक्यात कमवले तब्बल 9 कोटी!


गुरुवारी गुंतवणूकदार मालामाल! निफ्टी पहिल्यांदाच 22800 च्या पुढे, सेन्सेक्सही 770 अंकांनी वधारला!


आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं आणखी सोप्पं, RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही!