Beed:मस्साजोग प्रकरणात 'आकाचा आका ' असा  उल्लेख करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर या भेटीवर विरोधकांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्षेप घेतला .या भेटीनंतर सुरेश धसांवर मोठी टीका झाली .दरम्यान आज मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यानंतर महादेव मुंडे प्रकरणी परळीतही दाखल झाले होते . परळी (Parli) शहरात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas)यांना मुंडे समर्थकांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे .काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या विरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली . संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि परळीची बदनामी सुरेश धस यांनी केली आहे .ती त्यांनी थांबवावी अशी आग्रही भूमिका घेत मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती .

पोलीस अलर्ट मोडवर 

काळे झेंडे दाखवत सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त लावला .परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली होती .या भेटीनंतर एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना मुंडे समर्थकांनी हा विरोध केल्याचे पाहायला मिळाले .दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती .निषेध नोंदवणारे आणि काळे झेंडे दाखवणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे . (Beed Police)

पोलीस अधिकाऱ्यांवर संशयाची सुई- सुरेश धस

महादेव मुंडे व्यवसायिक असताना देखील त्याचा यात काय संबंध?, पोलीस अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे. आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले. मी ज्ञानेश्वरी मुंडे यांना विनंती करतो त्यांनी आपले उपोषण चार ते पाच दिवसांनी पुढे ढकलावे. या प्रकरणात काहीतरी प्रगती होईल मी स्वतः यात लक्ष घालत आहे.  त्या उपोषणावर ठाम राहिल्या तरी मी त्यांच्याबरोबर राहील.  मात्र विनंती त्यांनी आठ दिवसांची मुदत द्यावी, असं सुरेश धस यांनी सांगितले. सर्व पोलीस दल परळीतील हलवले पाहिजे. त्यांना परळी मतदारसंघ सोडून बाहेर न्यावे...अन्यथा हे सर्व पोलीस दल बीड जिल्ह्याच्या बाहेर न्यावे, ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितले. (mahadev Munde)

 

हेही वाचा:

Suresh Dhas Meet Mahadev Munde Family: वडील कुठून आणायचे, मुलं मागच्या वर्षीचे फोटो बघत होते; महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश, सुरेश धस काय म्हणाले?