एक्स्प्लोर

एक तर तुम्ही राहाल नाहीतर आम्ही, शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, परभणीत सरकारविरोधात शेतकरी आक्रमक  

शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरामधून विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा आदेश दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झालेत.

Parbhani : शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरामधून विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा आदेश दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाची होळी करत परभणीत शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं. आम्ही सरकारने कितीही सक्ती केली तरीही एक इंचही जमीन देणार नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

जमीन मोजणीसाठी येणारे अधिकारी तरी राहतील नाहीतर शेतकरी राहतील 

अधिकारी मोजणीसाठी जर शेतात आले तर एक तर अधिकारी राहतील नाही तर शेतकरी राहतील असा इशाराही यावेळी दिला. परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार बोंबाबोंब करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

शक्तिपीठ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी 

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक काल मंत्रालयात (Mantralaya) संपन्न झाली होती. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील 18 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या महामार्गास अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध असतानाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आल्याने शेतकरी (Farmers), आंदोलक आक्रमक होतील, असे दिसून येते. तसेच, राज्यात वस्तू व सेवा कर विधेयक आणण्याचा निर्णयही या बैठकी घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग - पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ , दोन ज्योतिर्लिंग  आणि  पंढरपूर  अंबेजोगाई सहित  १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा  शक्तिपीठ महामार्ग. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार  कोटी  रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग) मात्र, ठिकठिकाणी शेतकरी याचा विरोध करत आहेत. परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार बोंबाबोंब करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

कसा असेल शक्तिपीठ महामार्ग

विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे.  राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीडलातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा  खर्च येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता; विधानसभेच्या निवडणुकीआधी थांबवलं होतं भूसंपादन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget