Chandrashekhar Bawankule : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अनेक ठिकाणी नेते कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. परभणी जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी घेतल्या पाच जाहीर सभा घेतल्या आहेत. पक्षाशी विश्वासघात म्हणजे आईशी विश्वासघात- पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचाराला आता वेग
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचाराला आता वेग आला असून भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री तथा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीत आज एकाच दिवशी पाच सभा घेतल्या आहेत. हेलिकॉप्टरद्वारे बावणकुळे यांनी जिल्ह्याचे जिंतूर तर गंगाखेड हे दोन टोक गाठले आहे. त्यांच्यासमवेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर याही उपस्थित होत्या. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील इटोली, झरी,दैठणा महातपुरी तसेच वडगाव अशा पाच ठिकाणी आज बावनकुळे यांनी सभा घेतल्या आहेत. या सभांमधून बावनकुळे यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विकासाच्या मुद्यांवर विजयी करा असे आवाहन त्यांनी केले सोबतच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचा इशारा पक्षातील काही नेत्यांना दिला आहे.
पक्षात राहून पक्षाशी विश्वासघात म्हणजे आईशी विश्वासघात आहे त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांच्या ज्यांनी विरोधात काम केलं त्यांना निवडणुकीनंतर घरी पाठवणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केल आहे.