एका हत्या प्रकरणात जन्मठेप भोगत असलेल्या पप्पू कलानीचा फोटो भाजपच्या बॅनरवर झळकल्याने शहरात चर्चांना उत आला आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे स्वच्छ आणि पारदर्शक पक्ष असल्याची शेखी मिरवायची आणि दुसरीकडे गुंडांना आपल्या बॅनरवर स्थान देऊन मतं मागायची, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान उल्हासनगरवासियांचं पप्पू कलानींवर प्रेम असल्याने बॅनरवर त्यांचा फोटो वापरण्यात आल्याचा दावा टीम ओमी कलानीचे प्रवक्ते मनोज लासी यांनी केला आहे.