बीड/मुंबई : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी आजपासून आपण हार, फुलं स्वीकारणार नसल्याचा निर्धार केला आहे. बाल आशा ट्रस्टच्या आश्रमशाळेच्या भेटीनंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, त्यातून हा निर्धार व्यक्त केला आहे.


ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काल बाल आशा ट्रस्टच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी आश्रमातील लहानग्यांना पाहून त्या अतिशय भावूक झाल्या होत्या.

या भेटीसंदर्भातच त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली असून, यातून त्यांनी आजपासून आपण हार, फुलं स्वीकारणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शिवाय, अनाथ मुलांसाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. अनाथ मुलांच्या इलाजासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावे चेक किंवा डिमांड ड्राफ्ट द्यावा असं आवाहन त्यांनी या फेसबुक पोस्टमधून केलं आहे.

पंकजा मुंडेंची सविस्तर फेसबुक पोस्ट :