मी दिलेला शब्द पाळला, धनगर समाजालाही आरक्षण मिळवून देणार: पंकजा मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 01 Jun 2016 02:31 AM (IST)
अहमदनगर: 'डॉ. विकास महात्मेंना राज्यसभेची उमेदवारी देऊन मी दिलेला शब्द पाळला, आता धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही.' असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. अहमदनगरमधलं चौंडी गाव पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. 'सत्तेत गाजर दाखवून जमणार नाही. त्यामुळे महात्मेंना राज्यसभेची उमेदवारी देऊन मी दिलेला शब्द पाळला. मी शब्द देते की याच सरकार कडून तुम्हाला आरक्षण मिळणार. तुम्हाला आरक्षण नाही मिळालं तर तुमच्या आधी मी रस्त्यावर उतरेल.' असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी गृहराज्यमंत्री राम शिंदे देखील उपस्थित होते. जलयुक्त शिवार प्रकल्पात साठलेल्या पाण्याचं पाणी प्रबोधन पंकजा मुंडे करणार आहेत. त्यासाठी नऊ ते पंधरा ऑगस्ट जलचेतना यात्राही त्या काढणार आहेत.