Pankaj Deshmukh Death Case : भाजपा आमदार संजय कुटे ( Sanjay Kute) यांचे कारचालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी (Pankaj Deshmukh Death Case) पोलिसांनी (Police) महत्वाची माहिती दिली आहे. पंकज देशमुख यांची आत्महत्याच आहे. कुठलाही घातपात नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.
पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता
पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी सर्व बाजूंनी चौकशी केली 39 साक्षीदार तपासलेत, सीडीआर व सीसीटीव्ही ही तपासल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच अंतिम अहवाल सर्वांसमोर ठेवल्या जाईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले ड्रायव्हर पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता.
पंकज देशमुख याच्या हत्येप्रकरणी पत्नी सुनीता देशमुखांनी तीन संशयितांची नावे पोलीस अधीक्षकांना दिली होती
जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचा ड्रायव्हर पंकज देशमुख याच्या हत्येप्रकरणी पत्नी सुनीता देशमुखांनी तीन संशयितांची नावे पोलीस अधीक्षकांना दिली होती. त्यामध्ये आमदार संजय कुटे यांचा स्वीय सहाय्यक निलेश वर्माचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे या हत्या प्रकरणातील संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलिसांची यादीही सुनीता देशमुखांनी पोलीस अधीक्षकांना दिली. यावर आता पोलीस अधीक्षक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले ड्रायव्हर पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या मृतदेहाचं मृतकाच्या नातेवाईकांना विश्वासात न घेता अकोला येथील रुग्णालयात शवविच्छेदन केलं. मात्र पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने केला. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी सुनीता देशमुख यांनी लावून धरली आहे. दरम्यान, आज पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. पंकज देशमुख यांनी आत्महत्याच केली आहे. कुठलाही घातपात नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सर्व बाजूंनी चौकशी केली आहे. तसेच 39 साक्षीदारांची देखील चौकशी केली आहे. त्याचबरोबर सीडीआर व सीसीटीव्ही ही तपासल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pankaj Deshmukh : पंकज देशमुख हत्या प्रकरणी पत्नीने संशयितांची नावे दिली, भाजप आमदार संजय कुटेंच्या पीएचा सहभाग, तीन पोलिसांचीही तक्रार