परभणी : मराठवाडा जिल्ह्यातील एकूण चार जिल्हे तसेच विदर्भातील एका जिल्ह्यात आज (10 जुलै) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटेच्या या धरणीकंपामुळे मराठवाड्यात काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच भूकंपाच काही व्हिडीओ आता समोर आले आहेत. या भूकंपात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, भूकंपाचे धक्के आणि पाऊस तसेच हवामान यांच्यातील संबंधांबाबत हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी तातडीने एक व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे.  


मराठवाड्यात कोणकोणत्या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के (Marathwada and Vidarbha Earthquake)


मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा एकूण चाल जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत. पहाटे सात ते 7.30 यादरम्यान, हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. हिंगोली जिल्ह्याती भूकंपाची तीव्रता ही 4.5 रिश्टर स्केल एवढी होती. तर विदर्भातील वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भागात एकूण दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागांत भूकंप जाणवला. तर परभणी जिल्ह्यातील परभणी शहरासह सेलू, गंगाखेड आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले.


भूकंपाचे व्हिडीओ आले समोर (Hingoli Earthquake Video)


या भूकंपाचे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. एका व्हिडीओत जमीन हादरताना दिसतेय. तर दुसऱ्या एका व्हिडीओत छताला लावलेला फॅन भूकंपाच्या हादऱ्यामुळे हलताना दिसतोय. या भूकंपाच्या धक्क्यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  


भूकंपाचा व्हिडीओ :



पंजाबराव डख यांनी नेमकं काय सांगितलं? (Panjabrao Dakh)


मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के हे भविष्यातील चांगल्या पावसाचे चिन्ह असू शकते,  असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. "परभणीतील गुगळी धामणगाव येथे सकाळी 7.14 वाजता सगळ्यांना भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात आहे. भूकंप हा चांगल्या पावसाचे लक्षण आहे. जेव्हा-जेव्हा भूकंपाचे धक्के बसतात, तेव्हा-तेव्हा खूप पाऊस पडतो लातूल जिल्ह्यातील किल्लारीला जेव्हा भूकंप झाला होता, त्या वर्षी खूप पाऊस झाला होता. तशीच परिस्थिती यावेळी होणार आहे," असे पंजाबराव डख म्हणाले.


हेही वाचा :


मोठी बातमी! मराठवाडा, विदर्भात धरणीकंप; परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के


Video : हादरणारी जमीन, हलणारा फॅन, भूकंपाचा पहिला व्हिडीओ समोर; मराठवाडा, वाशिममध्ये धरणीकंपामुळे भीतीचं वातावरण!


CM Ladki Bahin Scheme: ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार