Umesh Patil on Balraje Patil : मोहोळमध्ये पंडित देशमुख (Pandit Deshmukh murder case ) यांची संतोष देशमुख यांच्यापेक्षाही निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केले. त्यात माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील (Balraje Patil ) हा मुख्य तर इतर एकूण 13 आरोपींना निर्दोष सोडण्यात आले होते. पोलिसात ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली ते कोर्टात फुटले होते. त्यातील साक्षीदारांना कारखान्यात नोकरी, टेंडर, सोलापुरात गाळे देण्यात आले आहेत, त्याचा तपास झाला पाहिजे असे उमेश पाटील म्हणाले. दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असी मागणी देखील उमेश पाटलांनी केली.
सरकारी पक्षाने हायकोर्टात दाखल केलेले अपील 20 वर्षात कोर्टाच्या बोर्डावार आले नाही
सरकारी पक्षाने हायकोर्टात दाखल केलेले अपील 20 वर्षात कोर्टाच्या बोर्डावार आले नाही. त्यामुळं यामध्ये नेमकं सरकारी यंत्रणेतील कोण मॅनेज झालंय का? हे तपासावं असेही उमेश पाटील म्हणाले. चुकीला माफी नाही, याचा बदला घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे उमेश पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या विधानाचे मी स्वागत करतो. तसेच आमची एकट्याची नव्हे तर संपूर्ण मोहोळ तालुक्याची मागणी आहे की, दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सरकारी पक्षातर्फे हरिष साळवी ही केस लढवतील ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे मत उमेश पाटील यांनी व्यक्त केले. पंडित देशमुख यांच्या हत्येचा न्यायालयीन मार्गाने बदला घेतल्यानंतर मोहोळ तालुक्याला न्याय मिळेल असेही उमेश पाटील म्हणाले.
आर आर आबांच्या पाया पडून माझ्या पोराला वाचवा म्हणत पाटीलकी गुंडाळून ठेवली
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील पंडित देशमुख हत्या प्रकरणावरुन आक्रमक झाले आहेत. पंडित देशमुख यांचा मर्डर या बाळराजे पाटलानं केल्याचे उमेश पाटील म्हणाले. यामध्ये 13 आरोपी होते. त्यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील होते. ते राष्ट्रवादीचेच होते. आर आर आबांच्या पाया पडून माझ्या पोराला वाचवा म्हणत पाटीलकी गुंडाळून घरी ठेवत गेले होते. हाच तो बाळराजे आहे, मर्डर करणारा बाळराजे पाटील होता. शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित देशमुखचा मर्डर केला. त्यांचे हातपाय तोडले, गळा कापला, जीभ कापली, एवढंच नाही तर विकृत बाळराजे पाटलाने त्यांच्या तोंडावर लघुशंका केली', अशा शब्दात उमेश पाटलांनी भीषण आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
माझं खरं आडनाव गुंड आहे, हे त्याने विसरू नये; भाजपात जाणाऱ्या राजन पाटलांचा राष्ट्रवादीच्या नेत्यास थेट इशारा