Pandharpur Vitthal Temple Security BVG Group : विठ्ठल मंदिराला (Vitthal Temple) सुरक्षा रक्षक (Security)  पुरवण्याचा 5 कोटी 77 लाख रुपयांचा ठेका बीव्हीजी ग्रुपला (BVG Group) मिळाला आहे. आजपासून मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी या ग्रुपची असणार आहे, याबाबतची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी एबीपी माझाला (Abp Majha)  दिली आहे. यापूर्वी ठेका असणाऱ्या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता. यानंतर मंदिरांनी निविदा प्रसिद्ध केल्यावर देशभरातून आठ एजन्सीने यासाठी दर दिले होते. विशेष म्हणजे या आठही एजन्सीने सर्विस चार्जेस म्हणून 3.85 इतका समान दर कोट केला होता. 

आजपासून BVG ग्रुप मंदिरासाठी जवळपास 220 सुरक्षारक्षक पुरवणार

यानंतर समितीने निविदेत दिलेल्या नियमानुसार मार्किंग सिस्टीम ठरवली होती. यात आठ पैकी तीन एजन्सींना शंभर पैकी 100 गुण मिळाले. यानंतर मंदिराला 300 पेक्षा जास्त माणसे पुरवणे या अटीमध्ये यातील दोन एजन्सी पात्र झाल्या. अखेर शेवटच्या अटी नुसार या दोन मधील टर्नओव्हर मध्ये बीव्हीजी ही एकमेव एजन्सी पात्र झाली आणि त्यामुळे विठ्ठल मंदिराचा हा ठेका या बीव्हीजी कंपनीला देण्यात आल्याचे राजेंद्र शेळके यांनी सांगितले. आता आजपासून मंदिरासाठी जवळपास 220 सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम बीव्हीजी करणार असून यांचा वापर मंदिर दर्शन रांग आणि मंदिर परिसरातील परिवार देवता येथे केला जाणार आहे. याशिवाय यात्रेसाठी लागणाऱ्या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारी ही बीव्हीजी वर असणार आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या बीव्हीजी साठी ही समितीची नियमावली असून या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजीवर असणार आहे.

पंढरपूर हे महाराष्ट्रातील महत्वाचं धार्मिक स्थळ

पंढरपूर हे महाराष्ट्रातील महत्वाचं धार्मिक स्थळ आहे. दररोज लाखो भाविक या ठिकाणी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. आषाढी आणि कार्तिकी या मोठ्या वारीला पंढरपुरात 8 ते 10 लाख भाविक जमा होतात. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आषाढी वारीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघते. या पालखीबरोबर महाराष्ट्रातील लाखो वारकरी चालत पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. त्याचबरोबर अन्य ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणात या वारीच्या वेळेस पालख्या येतात. त्यामुळं वारीच्या काळात वारकऱ्यांची मोठी गर्दी होत असते. 

वारकऱ्यांसाठी आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री