Pandharpur: पंढरपूरसाठीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सुरुवातीपासूनच वादग्रस्त बनला होता . याला शहरातील नागरिकांनी टोकाचा विरोध करत येथील प्रस्तावित अवाढव्य कॉरिडॉर रद्द करण्यासाठी आंदोलने केली होती . याचा फटका लोकसभा निवडणुकीतही भाजपला बसला होता . आता पुन्हा सोशल मीडियावर या प्रस्तावित आराखड्याची संकल्प चित्रफित सध्या  व्हायरल झाल्याने पुन्हा नागरिकात अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे . मंदिर परिसरातील पुरातन , वाडे , घरे , दुकाने पडून येथे हा कॉरिडॉर बनविण्याची संकलपना आहे . 


 पंढरपुरच्या तीर्थक्षेत्र आराखड्याची ही चित्रफीत कोणी तयार केली याबाबत माहिती नसली तरी शासनाने काही खाजगी संस्थांना अशा पद्धतीचा चित्रफित करण्याचं सुचवलं होतं त्यातीलच ही एक चित्रफित असण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे .  


काय आहे या चित्रफीतीत?


या चित्रफितीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारील कॉरिडोर कसा असणार याचा आराखडा आहे.  या ठिकाणची घरे पाडून त्या ठिकाणी काय काय सुविधा केल्या जाणार याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.  यात चौकांचे सुशोभीकरण, इतर ठिकाणचे सुशोभीकरण या सर्व बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. आता या चित्रफीतीनंतर  शासन पुन्हा हा आराखडा राबविणार का याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.


ही चित्रफीत आत्ताच कशी व्हायरल?


पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकासासाठी या भागातील घरे पाडून या ठिकाणी काय सुविधा करण्यात येणार याचा आराखडा आहे. या आराखड्याला सुरुवातीपासून नागरिकांचा विरोध आहे. दरम्यान,
ही चित्रफीत आत्ताच का सोशल मीडियावर व्हायरल झाली असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे . विधानसभेच्या तोंडावर पुन्हा या विकास आराखडा करताना नागरिकांना विश्वासात न घेतल्यास याचा फटका भाजपला बसेल अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .


विठ्ठलाचे दर्शन होणार सुलभ


अखेर 1 ऑक्टोबर पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा याची नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी  राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर पासून ऑनलाईन नोंदणी होणार असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र  संगणक प्रणाली विकसित करण्यास उशीर झाल्याने आता एक महिन्यानंतर म्हणजे 1 ऑक्टोबरपासून भाविकांना या सर्व पूजेचे ऑनलाईन बुकींग करता येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजा वाटपात कायम गैरप्रकार होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती. याची अनेक उदाहरणे समोर येत असताना मंदिर प्रशासनाने या गैरप्रकारला पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी पाऊल उचललं आहे. देवाच्या सर्व पूजा थेट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्याची संगणक प्रणाली आणल्याने आता यात घोटाळे करणाऱ्यांना काही गैरप्रकार करता येणार नाही.


हेही वाचा 


Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी